Nashik News: एकीतून फुलले नंदिनी पार्क, जॉगिंग ट्रॅकचे सौंदर्य! लवाटेनगर येथील पार्क बनला आदर्श

Park lawn and basketball court.
Park lawn and basketball court.esakal

सिडको (जि. नाशिक) : एकीकडे महापालिका प्रशासनाने उद्यान ठेकेदारांना दिलेल्या ठेक्यानंतर अनेक उद्यानांची दुरवस्था झाल्याचे चित्र स्पष्ट होत असताना दुसरीकडे सिडकोतील नंदिनी पार्क व जॉगिंग ट्रॅक यास अपवाद ठरत आहे.

सिटी सेंटर मॉल मागील लवाटेनगर येथे असलेल्या नंदिनी पार्क व जॉगिंग ट्रॅकला स्थानिक रहिवाशांनी सुंदर पद्धतीने जपले आहे. येथील ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांनीदेखील याची सुंदरता अबाधित राहण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

येथे येणाऱ्या प्रत्येकाने झाडांना पाणी देणे, आठवड्यातून एकदा स्वच्छता करणे, उद्यानात विविध औषधी वनस्पतीसह वड, पिंपळ अशा वृक्षांची लागवड करून देखभाल करण्याचा विडाच उचलला आहे. (beauty of Nandini Park Jogging track that blossomed from unity Nandini Park in Lavatenagar become ideal Nashik News)

उद्यानासाठी झटणारे रहिवासी
उद्यानासाठी झटणारे रहिवासीesakal

येथे सकाळी ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. तर आरोग्य सुदृढ राहण्याकरिता अनेक जन योगादेखील करतात. योगा करण्यासाठी स्वतंत्र जागा केलेली आहे, याचा उपभोग ज्येष्ठ व तरुणाईदेखील घेत आहे.

बालगोपाळांसाठी खेळणी बसवलेल्या असून तरुणांसह सर्वांना बास्केट बॉल कोर्ट बांधण्यात आले आहे. महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी झालेल्या दुरवस्थेबाबत कळवून लागलीच येथील कामे पूर्णत्वास नेनेही येथील सर्वांचीच जबाबदारी असल्याचे सांगत सर्वांना धारेवर धरून लागलीच येथील समस्या सोडवून घेतल्या जात असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.

येथील नागरिकांचे सर्वं नाशिककरांनी अनुकरण केल्यास नाशिक शहरातील ज्या उद्यानांची दुरवस्था झालेली आहे ती सर्वं उद्याने समस्यामुक्त उद्याने होऊ शकतील. उद्यानासाठी माजी नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, संजय सायंकार, रवींद्र पाटील, प्रभाकर निवारजे, अदन गोंधळे, धनंजय आलोटकर, नितीन नलणीकर, शिवाजी फरगडे, दीपक आहेर, वनिता आहेर, गणेश वाघजाळे, श्रीधर व्यवहारे, बाळासाहेब घोरपडे आदींसह परिसरातील समस्त रहिवासी या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी व स्वच्छतेसाठी प्रयत्न करीत असतात.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Park lawn and basketball court.
Nashik News : आक्रमक ठेकेदारांचा सार्वजनिक बांधकाम कार्यालयात ठिय्या!

*सुसज्ज बास्केटबॉल कोर्ट
*लहान बालगोपाळांसाठी खेळण्याची व्यवस्था
* उत्कृष्ट जॉगिंग ट्रॅक
*ग्रीन जिम
* योगा करण्यासाठी स्वतंत्र जागा
* ज्येष्ठ नागरिकांसह इतरांना बसण्याकरिता आसनाची व्यवस्था
*उद्यानात परिसरातील नागरिक एकत्र येऊन करतात स्वच्छता
* उद्यानात औषधी वनस्पती सह विविध वृक्षांची लागवड करण्यात आलेल्या आहे.
* उद्यानातील समस्या सोडवण्यासाठी व्यवस्थापनाला वेळोवेळी विचारणा
* स्वच्छतागृहाची देखील चांगली देखभाल
*मनपा कर्मचाऱ्यांना लावली चांगली शिस्त.
*लहान मुलांसाठी स्वरूप योग पाठशाळा सुरू

Park lawn and basketball court.
Dr. Bharati Pawar | एचएएलला साडेसहा हजार कोटींचे काम : डॉ. भारती पवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com