बिअरबार व देशी बार चालकांचा, अवैध मद्यविक्रीला विरोध | nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 illegal liquor sales

नाशिक : बिअरबार व देशी बार चालकांचा, अवैध मद्यविक्रीला विरोध

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यात अवैध देशी-विदेशी मद्याची खुलेआम विक्री सुरू असून याकडे स्थानिक पोलिस यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सिन्नर तालुका बिअरबार व देशी बार चालक-मालक संघटनेने केला आहे. पोलिसांनी कारवाई करून ही अवैध विक्री थांबवावी अशी मागणी करण्यात आली आहे.

अवैध मद्य विक्री करणाऱ्यांच्या संख्येत वाढ

सिन्नर शहरातील विविध भागात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या, लहान-मोठी हॉटेल्स, ग्रामीण भागात महामार्गावरील तसेच गावातील हॉटेल्सवर खुलेआमपणे अवैध मद्यविक्री सुरू आहे. उत्पादनशुल्क विभागाला, पोलिसांना न जुमानता ही मद्य विक्री करण्यात येते. सर्वच ठिकाणी सहजगत्या देशी-विदेशी मद्य उपलब्ध होत असल्याने सहाजिकच परवानाधारक बिअरबार व देशीबार चालकांचे नुकसान होत आहे. शासनाचा महसूल देखील बुडत आहे. सिन्नर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री बाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांना निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. तक्रार केल्यावर उलट अवैध मद्य विक्री करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा: नाशिक : ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार माहिती अधिकारात उघड

अवैध मद्यविक्रीला प्रतिबंध करण्याची मागणी

संबंधित यंत्रणांनी तातडीने कारवाई करून तालुक्यातील अवैध मद्यविक्रीला प्रतिबंध करावा अशी मागणी संघटनेतर्फे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना भेटून करण्यात आली. तालुकाध्यक्ष दत्तात्रय हांडे, उपाध्यक्ष नागेश लहामगे, सल्लागार प्रशांत गवळी, गणेश येलमामे, किरण वाजे, नाना पाटोळे, सचिन क्षत्रीय, सुरज सदगीर,नीलेश मुठाळ, रवींद्र लोंढे, निखिल लहामगे, मुकुंद कोकाटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: बेदाणा तयार करणे झाले महाग; उत्पादन साहित्याच्या दरात मोठी वाढ

Web Title: Beer Bar And Local Bar Operators Oppose Illegal Sale Of Liquor Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikliquorBar