Nashik: ‘ऑनलाईन’च्या नावाखाली लाभार्थी धान्यापासून वंचित! तहसील कार्यालयाने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

agitation
agitationesakal

लखमापूर : केंद्र सरकार जनतेसाठी मोफत धान्य उपलब्ध करून देत असताना, दिंडोरी तालुक्यातील अनेक गोरगरीब लाभार्थी धान्यापासून वंचित राहत आहेत. तहसील कार्यालयातून कार्ड ऑनलाईन नसल्याचे कारण देवून टोलवाटोलवी केली जात आहे.

यासंदर्भात तत्काळ दखल घेऊन पात्र लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव कावळे यांनी दिला आहे. (Beneficiaries deprived of grain in name of online Warning of agitation Tehsil office does not take notice Nashik)

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ योजना सुरू करूनही गोरगरीब जनता अनेक योजनांचा लाभापासून वंचित राहत असल्याने जनतेत तीव्र नाराजी आहे.

कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई करावी. दिंडोरी तहसील यंत्रणेच्या आडमुठेपणामुळे तालुक्यात सर्व सामान्य जनता त्रस्त झाली आहे.

अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजना, नवीन शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेत नवीन नावे समाविष्ट करणे, उत्पन्नाचा व जातीचा दाखला काढण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत.

तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारूनही रेशनकार्ड ऑनलाईन केले जात नाही. यासंदर्भात अनेक वेळा तहसीलदारांसोबतष चर्चा करूनही प्रत्यक्षात कार्यवाही केली जात नाही. परिणामी, केंद्र सरकार मोफत धान्य देत असूनही अनेक गरजू लाभार्थी धान्यापासून वंचित आहेत.

agitation
Diwali 2023: इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ तेजीत! भरघोस डिस्काउंट अन् सहज कर्जाच्या सोयीने ग्राहकांमध्ये उत्साह

काही दलालांच्या माध्यमातून रेशन कार्डधारकाकडून अवास्तव पैसे गोळा केले जात आहेत. त्यांच्यामार्फत सादर केलेल्या प्रकरणांना तत्काळ मान्यता दिली जाते.

दिंडोरी तहसील कार्यालयातील कारभारात सुधारणा न झाल्यास यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना समक्ष भेटून तक्रार करणार आहे. तत्काळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या शिधापत्रिका ऑनलाईन करून पात्र लाभार्थ्यांना धान्य करून देण्याची मागणी कावळे यांनी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

"दिंडोरी तहसील कार्यालय काही ठराविक दलालांच्या विळख्यात सापडले आहे. सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जात आहे. माझ्या गावातील ७० ग्रामस्थांना धान्य मिळत नसल्यामुळे मी स्वतः दीड वर्ष तहसील कार्यालयात हेलपाटे मारतोय. सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही कार्यवाही झालेली नाही. मात्र, तहसील कार्यालय व काही ठराविक सेतूचालकांनी निश्चित केलेल्या दरपत्रकानुसार पैसे आदा केल्यास तात्काळ कामे मार्गी लागतात." -वसंतराव कावळे, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप

agitation
Nashik Political News: ऑडिओ क्लीप व्हायरल करण्याची राजकीय खेळी! माणिकराव शिंदेंचा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com