Fraud Crime : सावधान! विवाहस्थळांच्या जाहिरातीतून होतेय फसवणूक

marriage fraud news
marriage fraud newsesakal

नाशिक : धकाधकीच्या काळात परंपरागत विवाह जुळविण्याच्या पद्धती कालबाह्य होऊन नव्याने उभ्या राहत असलेल्या ऑनलाइन विवाहाच्या संकेतस्थळावरच विवाह जुळविली जातात. आजच्या पिढीचाही त्याकडे कल वाढला आहे.

परंतु, यातून अनेकांची फसवणूक होत असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. वधू-वरांच्या विवाह जुळविण्यासाठी अनेक जाहिराती विविध माध्यमातून प्रसारित केल्या जातात आणि या जाहिरातींना भुलून पालकांची आर्थिक फसवणूक झाली आहे. (Beware Fraud is being done through fake advertisement of marriage Nashik Latest Crime News)

जयश्री कोतकर (रा. नाशिक) यांच्या भाच्यासाठी त्या वधूच्या शोधात होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना वधू-वर सूचक जाहिरात मिळाली. त्या जाहिरातीसमवेत असलेल्या मोबाईल क्रमांक ९०२८६३७४४९ या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. त्या वेळी या मोबाईल क्रमांकावरून रोहिणी पाटील या महिलेने विवाहस्थळाची माहिती दिली.

त्यानुसार, श्रीमती कोतकर यांनी भाच्याचा बायोडाटा संपर्क साधलेल्या मोबाईल क्रमांकाच्या व्हॉटस ॲपवर पाठविला. त्यानंतर पाटील या महिलेने श्रीमती कोतकर यांना वधूचा बायोडाटा पाठविला. तसेच, मुलगी पसंत असेल तर नाव नोंदणी बंधनकारक असल्याचे सांगितले. त्यानुसार श्रीमती कोतकर यांनी नाव नोंदणीसाठी असलेली दोन हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन भरली.

रक्कम भरल्यानंतर संबंधित पाटील यांनी वधूकडील पालकांची भेट घालून देण्याचे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात दोन-चार दिवस होऊनही संबंधित पाटील या महिलेकडून कोणताही संपर्क साधण्यात आला नाही. श्रीमती कोतकर यांनी सदर क्रमांकावर संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे याप्रकरणी फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

marriage fraud news
SAKAL Impact News : अभोणा- नांदुरी रस्त्याला 2 कोटींचा निधी

अकोल्यात कार्यालय

ज्या क्रमांकावरून फसवणूक करण्यात आली, त्यावर संपर्क साधला असता शादी पार्टनर डॉट कॉम असे वधू-वर सूचक संस्थेचे नाव असून ते अकोला येथे असल्याचे फोनवरून सांगितले. मात्र याच नावाचे ऑनलाइन संकेतस्थळाचे मुख्य कार्यालय हे दिल्लीत असून, उपकार्यालये देशभरात आहेत. परंतु त्यांचे अकोल्यात कार्यालय नाही. त्यामुळे संशयितांनी या संकेतस्थळाचे नाव वापरून वधू-वर पालकांनी फसवणूक केली जात असल्याचे दिसून येते.

"पैसे गेले याचे दु:ख नाही. परंतु, असा प्रकार म्हणजे कोणाच्या तरी भावनेशी खेळण्याचा प्रकार आहे. तसेच, आणखीही कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगूनच आर्थिक व्यवहार करावेत." - जयश्री कोतकर, नाशिक.

marriage fraud news
Nandurbar : बिबट्याने पाडला शेळीचा फडशा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com