
Nashik Crime News : भद्रकाली पथकाकडून पाच गुन्हे उघडकीस
जुने नाशिक : भद्रकाली ॲन्टी मोटारसायकल थेप्ट पथकाकडून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले असता, चौकशीत दुचाकी चोरी, घरफोडी, बॅग लिफ्टिंग अशा विविध प्रकारचे पाच गुन्हे उघडकीस आले. सोन्याचे दागिने, १५ मोबाईल, १ दुचाकी, १ टॅब असा सुमारे २ लाख ४५ हजारांचा ऐवज त्याच्याकडून जप्त करण्यात आला.
हेही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?
हेही वाचा: SAKAL Impact : विविध अधिकारी काकडमाळच्या दारी!; पात्र लाभार्थ्यांना जागीच शिधापत्रिकांचे वाटप
पथकातील शिपाई संतोष पवार यांना घरफोडीतील संशयित एनडी पटेल रोड येथे येथे असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अभिजित सोनवणे, अनिल आव्हाड, इरफान शेख, संतोष पवार, संदीप रसाळ, शिवाजी मुंजाळ, गोरक्ष साबळे, श्री. सूर्यवंशी यांनी सापळा रचून संशयित बाळू उकंडा ठोके (४०, रा. गंगाघाट फिरस्ता, मूळ रा. अंजनी बुलडाणा) याच्या मुसक्या आवळल्या. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पथकाने त्याच्याकडून १५ स्मार्ट मोबाईल, १ टॅब तसेच सोन्याचे दागिने जप्त केले. त्याने भद्रकाली आणि इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीतील ४ गुन्हे उघड केले.
त्याचप्रमाणे संशयित इम्रान अब्दुल सलाम शेख (रा. वडाळा गाव) यास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय परिसरात सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून विना क्रमांकाची दुचाकी हस्तगत केली. अंबड पोलिस ठाणे हद्दीतून दुचाकीची चोरीची तक्रार आहे. त्यानुसार दुचाकीसह त्याचा ताबा त्यांच्याकडे देण्यात आला. दोन्ही संशयितांकडून विविध प्रकारच्या पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली. त्यात दुचाकी चोरी, बॅग लिफ्टिंग, घरफोडी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. उकल झालेल्या गुन्ह्यांपैकी इंदिरानगर पोलिस ठाण्यातील ३, भद्रकाली पोलिस ठाण्यातील १ आणि अंबड पोलिस ठाण्यातील १ असे गुन्हे उघडकीस आले आहे.
हेही वाचा: Nashik News: सर्वसाधारण सभापतीपदामुळे राजकारण रंगणार!; महिलांसाठी सोडतीव्दारे 10 सभापतीपदे आरक्षित