Latest Crime News | विद्यार्थ्यांकडून खंडणी उकळणाऱ्या ‘भाई’ला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Crime News

Nashik Crime News : विद्यार्थ्यांकडून खंडणी उकळणाऱ्या ‘भाई’ला अटक

नाशिक : शालेय मुलांशी मैत्री करून त्यांना बंदुकीतून गोळी झाडून ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून बळजबरीने खंडणी वसुल करण्यास संशयिताला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. अथर्व देशमुख (२२, रा. आनंदवल्ली, गंगापूर), असे संशयिताचे नाव असून, त्याच्याविरुद्ध आणखी चार तक्रारी दाखल झाल्या आहेत. (Bhai arrested for extorting money from students Nashik Latest Crime News)

हेही वाचा: Nashik Crime News : सिन्नरला दिवसाढवळ्या 3 ठिकाणी घरफोड्या

गंगापूर पोलिसात गेल्या आठवड्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर संशयित खंडणीखोर अक्षय देशमुख याचे कारनामे उघडकीस येत आहेत. पोलिसांनी त्यास पंचवटी परिसरातून अटक केली. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर याप्रकरणी गंगापूर पाठोपाठ अंबड पोलिसातही देशमुख विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. संशयित देशमुख याने चांदशी परिसरातील शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी मित्राच्या माध्यमातून ओळख केली.

त्यानंतर तो स्वत:ला ‘भाई’ असल्याचे भासवून या सधन विद्यार्थ्यांच्या पैशांवर मौजमजा करीत होता. मात्र यातून त्याने नंतर या मुलांना बंदुकीतून गोळी झाडून ठार मारण्याची धमकी देत, त्यांना त्यांच्याच घरात चोरी करण्यास भाग पाडले. सदर बाब पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गंगापूर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल होताच, अंबड परिसरातील पालकांनीही अंबड पोलिसात धाव घेत तक्रार दिली आहे. त्यानुसार, गंगापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांनी अथ‌र्वच्या मागावर पथक रवाना केले. पंचवटी भागात लपलेल्या अथर्वला गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

हेही वाचा: Nashik Crime News : दोघे दुचाकी चोरटे जेरबंद; 4 लाखांच्या 9 दुचाकी जप्त