Latest Marathi News | पूर्व विभागात रुग्णालयासाठी मालेगाव स्टॅन्डवरील भांडार विभागाची जागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Adv. Rahul Dhikale

Nashik News : पूर्व विभागात रुग्णालयासाठी मालेगाव स्टॅन्डवरील भांडार विभागाची जागा

नाशिक : पंचवटी विभागात सर्वसामान्यांच्या सोयीसाठी मालेगाव स्टॅन्डवरील महापालिकेच्या भांडार विभागाच्या जागेत रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे सेवेसाठी रुग्णालय उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. (Bhandar section site at Malegaon stand for hospital in east division Nasik Latest Marathi News)

मागील दोन वर्षांपासून रुग्णालय साकारण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहे, मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मागणी होऊनही निधीची पूर्तता केली जात नव्हती. जून महिन्यात राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नवनियुक्त पालकमंत्री दादा भुसे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिल्याच बैठकीत आमदार ढिकले यांनी रुग्णालयाची मागणी केली. त्यानुसार पालकमंत्री भुसे यांनी महापालिका आयुक्तांना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

मात्र, सहा महिने उलटले तरी महापालिकेकडून जागेचा प्रस्ताव सादर केला जात नव्हता. सोमवारी (ता. १३) नियोजन समितीच्या बैठकीत आमदार ढिकले यांच्यासह सिडको विभागासाठी आमदार सीमा हिरे यांनी रुग्णालय संदर्भात काय झाले, अशी विचारणा केली. पालकमंत्र्यांनी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे चौकशी करताना तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Corruption News : घरपट्टी, पाणीपट्टीत ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचार; खडकसुकेणेकर एकवटले

जागे संदर्भात टोलवाटोलवी, आयुक्त संतापले

नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर महापालिका आयुक्त पुलकुंडवार यांनी विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी रुग्णालयाच्या जागा संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. या वेळी पंचवटी कारंजावर इंदिरा गांधी रुग्णालय असल्याने पाच मिनिटाच्या अंतरावरच मालेगाव स्टॅन्डवरील भांडार विभागाची जागा रुग्णालयासाठी योग्य होणार नसल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्यानंतर आयुक्त संतापले.

शासनाकडे जागेची मागणी केल्यास त्यास विलंब लागेल. महापालिकेची जागा दिल्यास येत्या एक दीड वर्षात रुग्णालय साकारले जाईल. आमदारांची मागणी व पालकमंत्र्यांच्या सूचनांचा विचार करून भांडार विभागाच्या जागेचा प्रस्ताव देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

"पंचवटी विभागात रुग्णालयासाठी मालेगाव स्टॅन्डवरील भांडाराची जागाच योग्य आहे. मध्यवर्ती तसेच गोदा घाटापासून जवळचे अंतर आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय तातडीने उभारले जाईल." - ॲड. राहुल ढिकले, आमदार

हेही वाचा: Nashik News : गावगाड्याच्या निवडणुकीने राजकीय कुरघोड्या; गुलाबी थंडीत गावांमध्ये राजकारण तापले

टॅग्स :NashikHospitalpanchavati