Nashik News : भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेडचा ‘महापशुधन संजीवनी उपक्रम’ धाराशिवमध्ये

livestock
livestockesakal

शिर्डी (जि. नाशिक) : इन्डसइंड बँकेच्या पूर्ण मालकीची एक उपकंपनी भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेडने (बीएफआयएल) त्यांच्या महापशुधन संजीवनी उपक्रमाचा धाराशिव जिल्ह्यात विस्तार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान (एमएसआरएलएम) आणि पशुसंवर्धन विभाग यांच्याबरोबर भागीदारी केली आहे.

२०२० मध्ये चालू झाली ही सहभागीदारी १९६२ या टोल फ्री नंबरच्याद्वारे शेतकऱ्यांच्या घरोघरी पशुवैद्यकीय सेवा पुरवून महाराष्ट्राच्या धाराशिव जिल्ह्यातील महिलांच्या नेतृत्वाखालील ए- हेल्प संवर्गाला पाठिंबा देण्यात मदत करेल.

याशिवाय, महिलांच्या नेतृत्वाखालील ए- हेल्प संवर्ग बीएफआयएलने विकसित केलेल्या तंत्रज्ञान व्यासपीठाद्वारे पशुवैद्यांशी संपर्क साधू शकतील. (Bharat Financial Inclusion Limiteds Mahapushudhan Sanjeevani initiative in Dharashiv Nashik News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

livestock
Nashik News : केन्सिंगटन चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या खेळाडूंचा लिलाव

या करारानुसार, पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांचे टॅगिंग करणे, लसीकरण, जंतनाशक देणे, कृत्रिम गर्भादान, किरकोळ जखमांवर उपचार अशा पशुवैद्यक सेवा घरोघरी पुरवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील एमएसआरएलएम मधील ४० पशु सखी कॅडर्सना (पशुधन उत्पादनाच्या आरोग्य आणि विस्तारासाठी मान्यताप्राप्त एजंट -एक्रेडिटेड एजंट फॉर हेल्थ एंड एक्स्टेंशन ऑफ लिव्हस्टोक प्रॉडक्शन- ए एचईएलपी) प्रशिक्षित केले जाईल.

त्यांना महत्त्वाचे व प्राथमिक संपर्काचे ठिकाण म्हणून धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि कळंब तालुक्यातील महापशुधन संजीवनीशी देखील जोडले जाईल. भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड (बीएफआयएल) त्यांच्या सीएसआर निधीद्वारे पशुवैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखालील ए- हेल्प संवर्गांना त्यांच्या कामानुसार मानधन देईल.

बीएफआयएलच्या सीएसआर चे प्रमुख आणि मुख्य जन अधिकारी श्रीनिवास रेड्डी वुदुमूला, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त आयएएस सचिंद्र प्रतापसिंग, एमएसआरएलएम चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयएएस डॉ. हेमंत वासेकर, पशुसंवर्धन विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता, सीएसआरचे वरिष्ठ लीड मॅनेजर डॉ. प्रेमनाथ सिंग आणि पशुसंवर्धन विभागाचे व इन्डसइंड बँकेचे अन्य अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षरी आणि देवाणघेवाण करण्यात आली.

livestock
DHL Express Campaign : डीएचएल एक्‍स्‍प्रेसच्‍या मोहिमेला मुंबई इंडियन्सचे खेळाडू देणार पाठिंबा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com