नाशिक- केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘भारतमाला’ योजनेच्या अंमलबजावणीत मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत. या योजनेंतर्गत उभारण्यात येणारा सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली. दीड वर्षापासून प्रकल्पाचे काम ठप्प असून, केंद्र सरकारने ही योजना गुंडाळण्याचा विचार केल्याचे समजते. परिणामी, नाशिकसह सहा राज्यांतील हा हजारो कोटींचा महामार्ग प्रकल्प अंधारात गेला आहे.