Bhaubeej 2023: सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती...! शहरात भाऊबीज उत्साहात साजरी

bhaubeej 2023
bhaubeej 2023esakal

Bhaubeej 2023: सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया..., असे म्हणत आपल्या लाडक्या भाऊरायाकडून भाऊबीजेच्या दिवशी हक्काची ओवाळणी घेत भाऊबीज सण बुधवारी (ता.15) सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. (Bhaubeej was celebrated with enthusiasm in nashik news)

दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे यमद्वितीया किंवा भाऊबीज. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जाऊन ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो. यावेळी बहिणही भावाला औक्षण करते आणि भेटवस्तू देते अशी प्रथा आहे. हा सण बुधवारी घरोघरी उत्साहात साजरा झाला. सासरी गेलेल्या बहिणीला माहेरी दिवाळसणाला आणणाऱ्या भावंडांचीही लगबग दिसून आली.

सासरी गेलेल्या बहिणीला आणायला जाणाऱ्या भावडांची खूप लगबग दिसून आली. लग्न होऊन पहिल्यांदाच सासरी दिवाळी साजरी करणाऱ्या बहिणी भाऊबीज साजरी करण्यासाठी मोठ्या आतूरतेने भावडांची वाट पाहत होते. तेवढ्याच तळमळीने भावडांनीही बहिणीला माहेरी घेऊन जाण्याची धडपड दाखवली.

bhaubeej 2023
Bhaubeej 2023 : देशातल्या या गावात आहेत भाऊ-बहिणींचे मंदिर, इतिहास अन् प्राचिनता थक्क करणारीच आहे

मुंबई-आग्रा महामार्गावर मोटारसायकलवरून घरी नेताना, जुने सीबीएस, ठक्कर बाजार येथे एसटी बसमध्येही भरपूर गर्दी होती. आपल्या लाडक्या भाऊरायाला ओवाळून त्याला उदंड आयुष्य लाभो, भावंडांना यश लाभो अशी मनोकामना या वेळी करण्यात आली. लाडक्या भावाला ओवाळल्यानंतर बाजारपेठ, मेनरोड येथे बहिणीला साडी, ज्वेलरी, पुस्तके, चॉकलेट, नवीन ट्रेण्डी पंजाबी ड्रेस आदी खरेदीसाठी गर्दी झाली होती.

तसेच नवीन मोबाइल, तर अगदी टू व्हिलरही भावडांकडून ओवाळणी म्हणून बहिणीला दिली. तर काही बहिणींनी त्यांच्या धाकट्या भावाला आवडीच्या वस्तू दिल्या. त्यात चॉकलेट्स, सायकल, ड्रेस, खेळणी, कॉलेजमधील भाऊरायांसाठी रिस्ट वॉच, ब्रॅण्डेड शुज, मोबाइल गिफ्ट म्हणून देण्यात आले.एकूणच भाऊबिजेच्या सणानिमित्त चैतन्याचे वातावरण दिसून आले.

bhaubeej 2023
Bhaubeej 2023 : बहिणीच्या जिद्दीपुढे संकटही झुकले; भावाला यकृत देवून भाऊबीज साजरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com