भाऊबिजेनिमित्त माहेरवाशिणींची पावले माहेराकडे; बसस्‍थानकांवर गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bus stand

भाऊबिजेनिमित्त माहेरवाशिणींची पावले माहेराकडे!

नाशिक : दिवाळीचा सण साजरा केल्‍यानंतर भाऊबिजेनिमित्त महिला वर्गाने माहेरच्‍या दिशेने पावले वळविली होती. यातून माहेरवाशिणींची शहर परिसरातील बसस्‍थानकांवर गर्दी झाली होती. शनिवारी (ता.६) सकाळपासून प्रवाशांनी बसस्‍थानके गजबजली होती.

एसटीतर्फे जादा बसगाड्या

शहरातील नवीन सीबीएस बसस्‍थानकाहून पुणे, धुळे, औरंगाबादसह अन्‍य मार्गांकरिता बसगाड्या उपलब्‍ध होत्‍या. तर जुने सीबीएस बसस्थानकावरून जिल्‍हांतर्गत विविध मार्गांकरिता बसगाड्या धावल्‍या. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता एसटी महामंडळातर्फे जादा बसगाड्या उपलब्‍ध करून दिल्‍या होत्या. शनिवारी (ता.६) भाऊबिजेचा सण असल्‍याने माहेरवाशिणी आपल्‍या माहेरी रवाना होत होत्‍या. यामुळे सकाळपासून बसगाड्यांना गर्दी बघायला मिळाली. महिलांसोबत त्‍यांचे चिमुकले बघायला मिळाले. कोरोना (Corona) महामारीच्‍या पार्श्वभूमीवर बहुतांश प्रवाश्‍यांनी मास्‍क, सॅनिटायझरसह अन्‍य उपाययोजनांवर भर दिला. यापूर्वी दिवाळीच्‍या सणानिमित्त गावी गेलेले चाकरमाने परतीचा प्रवास करतील. अशात पुढील चार-सहा दिवस अशाच प्रकारे बसस्‍थानकांवर प्रवाश्‍यांची गर्दी राहणार असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त होतो आहे. त्‍याअनुषंगाने एसटी महामंडळाने नियोजन आखले आहे.
दरम्‍यान कधी निर्बंध तर कधी आंदोलनामुळे तिजोरीत खडखडाट झालेल्‍या एसटी महामंडळाची दिवाळी प्रवाशांच्या वाढत्‍या प्रतिसादामुळे काहीशी गोड ठरते आहे.

हेही वाचा: गॅस सिलेंडरचे दर कमी करावे यासाठी मोदींच्या प्रतिमेचे औक्षण

आंदोलनाचा घटला प्रभाव

ऐन दिवाळीच्‍या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्‍या आंदोलनामुळे बससेवा प्रभावित झाली होती. परंतु बहुतांश आगारांतून बसगाड्या सोडल्‍या जात असल्‍याने आंदोलनाचा प्रभाव घटल्‍याची स्‍थिती आहे.

हेही वाचा: ऐन दिवाळीत पडलेल्या अवकाळीने भातपीकाचे प्रचंड नुकसान

Web Title: Bhaubij Celebration In Diwali 2021

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Diwali FestivalNashik