Leopard Alert
sakal
नाशिक: भोसला मिलिटरी शाळेच्या परिसरात सोमवारी (ता.१७) सकाळी दहाला बिबट्या दिसल्याच्या बातमीने एकच गोंधळ निर्माण झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शाळेचा अवघा परिसर पिंजून काढला. थर्मल ड्रोनच्या सहाय्याने परिसराची तपासणी केल्यावर वन विभागाने बिबट्या नसल्याचा निर्वाळा दिला. पण, सुरक्षिततेचा उपाय म्हणून शाळा प्रशासनाने सकाळचे सत्र अर्धा तास अगोदर सोडले; तर दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुटी दिली. या सर्व घटनाक्रमात विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण होते.