‘बीएच‘बीएचआर’ ची अवसायन प्रक्रिया‘बीएचआर’ ची अवसायन प्रक्रियाआर’ ची अवसायन प्रक्रिया

‘बीएच‘बीएचआर’ ची अवसायन प्रक्रिया‘बीएचआर’ ची अवसायन प्रक्रियाआर’ ची अवसायन प्रक्रिया
Published on: 
टुडे एक : फ्लायर --- ‘बीएचआर’ची अवसायन प्रक्रिया ११ वर्षांनंतरही ठप्प निवृत्त उपनिबंधक बलसानेंवर सहकार खाते मेहरबान? तीन मोठ्या संस्थांच्या अवसायनाची जबाबदारी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेच्या अवसायन प्रक्रियेला गुरुवारी (ता. १५) अकरा वर्षे पूर्ण होत असतानाही निपटाऱ्याची ठोस चिन्हे दिसत नाहीत. संस्थेच्या संचालकांच्या कार्यकाळातील कथित गैरव्यवहारांचे लेखापरीक्षण आणि अवसायनाच्या काळातील गेल्या आठ ते दहा वर्षांच्या लेखापरीक्षणाचा मुद्दा अद्याप अनुत्तरित असल्याने शासन या संस्थेबाबत इतके उदासीन का, असा प्रश्‍न ठेवीदारांकडून उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांत शाखांचे जाळे असलेल्या या संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आणि लाखो ठेवीदारांच्या हिताचा विचार करता अवसायन प्रक्रिया गतिमान होणे आवश्यक आहे. मात्र, बीएचआरचे अवसायक गौतम बलसाने यांच्याकडे अन्य दोन मोठ्या सहकारी संस्थांचाही अतिरिक्त कार्यभार असल्याने बीएचआरच्या कामकाजाला पुरेसा वेळ मिळतो का, असा प्रश्न ठेवीदार उपस्थित करीत आहेत. ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या रकमा लवकरात लवकर परत मिळाव्यात, यासाठी बीएचआरला स्वतंत्र अवसायक नेमण्याची मागणी जोर धरत आहे. न्याय मिळेल कसा? बीएचआर’च्या अवसायनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या बलसाने यांच्याकडे जळगाव जिल्ह्यातील लोकमित्र चंद्रकांत हरी बढे सर आणि बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर अर्बन बँक या संस्थांचाही अवसायक म्हणून अतिरिक्त कार्यभार असल्याचे सांगितले जाते. एकाच अधिकाऱ्याकडे तीन संस्थांची जबाबदारी सोपविण्यामागील प्रशासकीय भूमिका काय, असा सवाल ठेवीदारांकडून उपस्थित होत आहे. स्वतंत्र अवसायकाची मागणी केंद्रीय व राज्य सहकार विभागाने संस्थेच्या सर्व प्रलंबित लेखापरीक्षणांचा तपशील जाहीर करावा. कर्जवसुलीला गती देऊन जप्त मालमत्तांच्या लिलावाचा प्रश्न मार्गी लावावा आणि ठेवीदारांना त्यांच्या हक्काचा पैसा परत मिळण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा. या सर्व प्रक्रिया गतिमान करण्यासाठी बीएचआरवर स्वतंत्र अवसायकाची नियुक्ती करावी, अशी मागणी ठेवीदारांकडून करण्यात येत आहे. ------ आकडे बोलतात... - संस्था अवसायनात गेली : ऑक्टोबर २०१५ - संस्थेच्या एकूण शाखा : २६४ - ठेवीदारांची संख्या : तीन लाखांहून अधिक - २०२४ मधील न्यायालयीन नोंदीतील ठेवी : सुमारे ७४० कोटी रुपये - संचालकांच्या कार्यकाळातील लेखापरीक्षण : उपलब्ध नाही - अवसायनानंतरचे लेखापरीक्षण : उपलब्ध नाही - आजवर परत केलेल्या ठेवींची रक्कम : ठोस आकडेवारी उपलब्ध नाही - वसुलीपात्र कर्जाची रक्कम : अद्ययावत आकडेवारी उपलब्ध नाही - मालमत्ता विक्रीतून मिळालेली रक्कम : आकडेवारी उपलब्ध नाही - जप्त मालमत्ता विक्रीतून मिळणार असलेली रक्कम : आकडेवारी उपलब्ध नाही --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com