esakal | "पराभव पचवायची सवय लावून घ्या…", भुजबळांंचा चंद्रकांत पाटलांंना सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal,Chandakant Patil

"पराभव पचवायची सवय लावून घ्या…", भुजबळांंचा चंद्रकांत पाटलांंना सल्ला

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : बंगालमध्ये ममतदिदी या झाशीच्या राणीप्रमाणे मेरा बंगाल नही दूंगा या न्यायाने लढल्या. त्याचा चंद्रकांतदादा पाटील यांना राग येण्याचे कारण नव्हते. मात्र पराभव पचविण्याची सवय नसल्याने त्यांना राग आला असावा. पण यापुढे त्यांना वारंवार असे पराभव पचावावे लागणार असल्याने चंद्रकांत दादा पाटील यांनी पराभव पचवायची सवय लावून घ्यावी असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.

पराभव पचवायची सवय नसल्याने चंद्रकांतदादा काहीही बोलू लागले आहे. माझ्या अटके दरम्यान माझे पुतने माजी खासदार समीर भुजबळ त्यांच्याकडे विनंत्या करायचे असही ते म्हटल्याचे मी ऐकल. वास्तविक माझे पुतने समीर यांना माझ्या अगोदर दोन महिणे अटक झाली. त्यानंतर मला अटक झाली असे असतांना समीर हे काय जेल मधून चंद्रकांतदादा पाटील यांना भेटायला जायचे का, माझ्या अटकेनंतर समीर जेलमधून कसा भेटायला जाईल. राहिला प्रश्न माझ्या मुलाचा तोही कधी भेटायला गेला नाही. पण सध्या ते उगाचच काहीही बोलू लागले आहे. एकदा पराभव होउ लागले की, अस होत त्यामुळे त्यांनी पराभव पचवायची सवय करुन घेतली पाहिजे. असेही भुजबळ म्हणाले.

हेही वाचा: नाशिक शहरात ऊसनवारीच्या लसींचाही तुटवडा; मोहिमेला सलग 2 दिवस ब्रेक

..भारी पडेल कसे ?

मला भारी पडेल असेही ते म्हणाले सीबीआय, ईडी, यासारख्या संस्थाचा सत्तेमुळे उपयोग करतात अस मी ऐकल होत. पण माझे सगळे खटले सध्या कोर्टात सुरु आहे. माझ्या कोर्टात सुरु असलेल्या खटल्याबाबत मला भारीपडेल म्हणजे काय ? आता कोर्टाचे निर्णयही चंद्रकांतदादा ठरवू लागले आहे का ? कोर्टाचे निर्णय घेणारे हे कोण ?

असा प्रश्न उपस्थित करीत, भुजबळ म्हणाले की, यावर मला जास्त काही चर्चा करायची नाही. एवढ्या मोठ्या पराभवामुळे ताण तणाव येउ शकतात. अशाच ताणतणावातून ते बोलले असावे म्हणूनच माझ म्हणण आहे. की, ताणतणाव पचवायची सवय करुन घ्यावी.

धमक्याची चौकशी करावी

देशातील उद्योजक आदर पूनावाला यांनी लंडनमध्ये आपल्‍याला उच्च पदस्थांच्या धमक्या येत असल्याचे म्हटले आहे. त्याविषयी विचारले असता. सीबीआय एनआय, अशा सगळ्या यंत्रणा कुणाच्या ताब्यात आहेत. देशाबाहेर जाउन उद्येजकाला असे म्हणण्याची वेळ का येते याची चौकशी व्हावी. त्याची दखल कोण घेणार

हेही वाचा: नाशिक महापालिका उभारणार एअर ऑक्सिजन प्लांट

loading image