esakal | रेमडेसिव्हिर प्रभावी ठरतेच हा मोठा गैरसमज!

बोलून बातमी शोधा

remdesivir

रेमडेसिव्हिर प्रभावी ठरते हाच मोठा गैरसमज! महापालिका आयुक्त सांगतात...

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना रुग्णांवर रेमडेसिव्हिर इंजेक्शन प्रभावी ठरते, असा जनमानसात गैरसमज असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्यानुसारचं इंजेक्शन द्यायचे कि नाही ते ठरवावे, असे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.

वैद्यकीय संघटनेच्या बैठकीत खुलासा

कोरोना बाधित रुग्णाला रेमडेसिव्हिर द्यावे की नाही, याबाबत महाराष्ट्र राज्य कोविड टास्क फोर्सने निर्देशित केले आहे. त्या आधारे इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच नाशिक वैद्यकीय संघटनाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्यानुसार रेमडेसिव्हिर इंजेक्शन बाबत खुलासा करण्यात आला आहे.

हेही वाचा: कोविड सेंटरमध्ये 'नो स्टंटबाजी'; एकाच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये पेटला वाद

रेमडेसिव्हिरबाबत जनमानसात गैरसमज

रेमडेसिव्हिर इंजेक्शन कोविड बाधित रुग्णांचे जीव वाचविणारे प्रति विषाणू औषध आहे, असा जनमानसात गैरसमज निर्माण झाला असून तो दूर करणे गरजेचे असल्याचे मत टास्क फोर्सने व्यक्त केले. रेमडेसिव्हिरच्या गैरसमजामुळे रुग्ण, नातेवाईक, उपचार करणारे डॉक्टर यांच्यावर दबाव येत आहे. त्या अनुषंगाने इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील आवाहन केले आहे. त्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनमुळे रुग्णाचे प्राण वाचत नाही. आजाराच्या सुरुवातीला दोन ते नऊ दिवसात इंजेक्शन दिले तरचं उपयोग होतो. योग्य वेळी दिल्यास या इंजेक्शनमुळे पेशंटला हॉस्पिटलमध्ये केवळ दोन दिवस राहावं लागतं. इंजेक्शनमुळे विषाणू शरीरात वाढण्याची प्रक्रिया थांबते. नंतर प्रकृती सुधारण्यासाठी कमीत कमी २ दिवस लागतात, इंजेक्शन शिवायही पेशंटला वाचवता येतं, होम आयसोलेशनमधील रुग्णाला इंजेक्शन देता येणार नाही, असे टास्क फोर्सच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. कोरोना बाधित रुग्णाला इंजेक्शन रेमडेसिव्हिर द्यावे की नाही हे तज्ज्ञ डॉक्टरांनी ठरवणे सोईस्कर राहील, असे आयुक्त श्री. जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

हेही वाचा: लेकाच्या डोक्यावर अक्षता टाकून कृषिमंत्री लगेच ऑन फिल्ड!