Gaurav Ahire
sakal
नाशिक: आदिवासी आयुक्तालयासमोर सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनाने अखेर पहिला बळी घेतला आहे. पेठ तालुक्यातील बोरवड आश्रमशाळेतील चतुर्थश्रेणी रोजंदारी कर्मचारी गौरव विक्रम अहिरे (वय २१) यांनी नोकरी गमावल्याच्या नैराश्यातून विषप्राशन करून आत्महत्या केली. चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर शुक्रवारी (ता. १९) रात्री अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.