Birhad Protest
sakal
नाशिक: बिऱ्हाड आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी (ता. २३) त्यांच्या न्यायहक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढला. या वेळी आंदोलनकर्त्यांनी अंगावर झाड-पाला परिधान करत पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करत शासनाचा निषेध नोंदविला. या वेळी ‘एकच नारा कायम करा’ अशी मागणी करताना शासनाने दखल न घेतल्यास शिक्षणाकडून पुन्हा जंगलाकडे जावे लागेल. तसेच शस्त्रे घेऊ, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या वेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.