नाशिक: रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी गेल्या ४१ दिवसांपासून सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलकांनी आता आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात झाली आहे. आदिवासी कार्यालयासमोर आंदोलनास बसलेल्या कर्मचाऱ्यांतर्फे २५ ऑगस्टला उलगुलान जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. ग्रामीण भागातून बैलगाडी, गायी, म्हशी, शेळ्या, गुरे, कोंबड्या, शेती अवजारे यांच्यासह सकाळी दहापासून तपोवनातून उलगुलान मोर्चा काढण्यात येणार आहे. आंदोलकांना आयुक्तालयात प्रवेश न दिल्यास आयुक्त कार्यालयामध्ये कोंबड्या सोडण्यात येणार आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील ३१ आदिवासी संघटना सहभागी होणार आहेत.