esakal | भाजप नगरसेविकेच्या भावाचा कोरोनाने मृत्यू; समर्थकांची हॉस्पिटलमध्ये तोडफोड
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

भाजप नगरसेविकेच्या भावाचा कोरोनाने मृत्यू; समर्थकांची हॉस्पिटलमध्ये तोडफोड

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : नाशिकमध्ये सर्वसामान्यसह राजकीय लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाशी लढत असताना आधीच आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत हॉस्पिटलवर हल्ला केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काय घडले नेमके?

नगरसेविका समर्थकांनी हॉस्पिटलमध्ये राडा

नाशिकमध्ये भाजप नगरसेविका प्रियंका घाटे यांचा भाऊ रोशन घाटे याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर मानवता केअर हॉस्पिटल मुंबई नाका येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी रात्री रोशन घाटे यांचं कोरोनामुळे निधन झालं. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ धक्काबुकी करण्यात आली. एवढंच नाहीतर संतप्त झालेल्या समर्थकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली. हॉस्पिटलच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. नाशिकमध्ये भाजप नगरसेविका प्रियंका घाटे यांच्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रियंका घाटे आणि त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलमध्ये राडा घातला.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..

हॉस्पिटल प्रशासनाकडून कोरोना रुग्ण दाखल करण्यास नकार

हॉस्पिटलमध्ये तोडफोडीनंतर हॉस्पिटल प्रशासनाकडून कोरोना रुग्ण दाखल करून घेण्यास नकार दिला आहे. तसंच या प्रकारानंतर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि डॉक्टरांचा कामावर येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.प्रियंका घाटे या नाशिकमध्ये सर्वात तरुण नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. वयाच्या अवघ्या 21 वर्षी त्यांनी नगरसेविका होण्याचा बहुमान पटकावला होता.

हेही वाचा: प्रबळ इच्छाशक्तीने कोरोनावर मात! मनमाडच्या ९२ वर्षीय आजोबांचा लढा

loading image