esakal | "चिनी सीसीटीव्ही'मध्ये तर महाराष्ट्रातील भाजपच कैद!.."बॉयकॉट चायना' मोहीम भाजपला ठरणार अडचणीची?

बोलून बातमी शोधा

bjp and cctv.jpg

दिल्ली शहरात बसविण्यात आलेल्या चिनी कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत आम आदमी पक्षाला घेरण्यास सुरवात केली खरी; पण राज्यात "बॉयकॉट चायना' मोहीम भाजपला अडचणीची ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

"चिनी सीसीटीव्ही'मध्ये तर महाराष्ट्रातील भाजपच कैद!.."बॉयकॉट चायना' मोहीम भाजपला ठरणार अडचणीची?
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : दिल्ली शहरात बसविण्यात आलेल्या चिनी कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत आम आदमी पक्षाला घेरण्यास सुरवात केली खरी; पण राज्यात "बॉयकॉट चायना' मोहीम भाजपला अडचणीची ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

"बॉयकॉट चायना' मोहीमेसाठी महाराष्ट्रात भाजप अडचणीत
महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, ठाणे व पुणे या शहरांमध्ये चार हजारांपेक्षा जास्त सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. चीनमधील व्हिकव्हिजन या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता असून, भाजपच्याच सत्ताकाळात स्मार्टसिटी कंपनीची स्थापना करण्यात आली. मात्र, आतापर्यंत एकही ठोस काम झालेले नाही. सीबीएस ते त्र्यंबक नाका या सुमारे 22 कोटी रुपये खर्चाच्या स्मार्ट रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचा दावा होत असला, तरी या स्मार्ट रोडवर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे चायनीज कंपनीचे आहेत. महाराष्ट्रात भाजप सरकारच्या कार्यकाळात आर्थिक राजधानी मुंबईसह नाशिक, पुणे, औरंगाबाद, ठाणे व नागपूर या स्मार्टसिटींत समावेश असलेल्या शहरांमध्ये महाआयटीतर्फे बसविले जात असलेले सीसीटीव्ही चिनी कंपनीचे असल्याची बाब समोर आल्याने महाराष्ट्रात भाजप अडचणीत सापडला आहे. 

भाजप सरकारने याच चिनी कंपनीचा आग्रह का धरला? 
सीसीटीव्ही व त्यासाठी कमांड कंट्रोल सेंटर (सीसीसी) तयार करण्यावर होणारा खर्च स्मार्टसिटी कंपनी करणार असली, तरी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महाआयटी कंपनीकडे निधी वर्ग करून त्यामार्फतच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वास्तविक महाआयटीकडे निधी नसताना फडणवीस यांनी महाआयटी या सरकारी कंपनीला सीसीटीव्ही बसविण्याचे काम का दिले? युरोप, अमेरिकेने व्हिकव्हिजन या चायनीज कंपनीच्या उत्पादनांवर बंदी आणली असताना महाराष्ट्रात भाजप सरकारने याच चिनी कंपनीचा आग्रह का धरला, यांसारखे प्रश्‍न आता समोर येत असल्याने, राज्यात "बॉयकॉट चायना' मोहीम भाजपला अडचणीची ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

हेही पाहा> VIDEO : मुलाच्या विवाहाचा आनंद..अन् विधानसभा उपाध्यक्षांच्या नृत्याची झलक..एकदा बघाच!

"चिनी सीसीटीव्ही'मध्ये महाराष्ट्रात भाजपच कैद 
दिल्ली शहरात बसविण्यात आलेल्या चिनी कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत आम आदमी पक्षाला घेरण्यास सुरवात केली खरी; परंतु महाराष्ट्रात भाजप सरकारच्या कार्यकाळात आर्थिक राजधानी मुंबईसह नाशिक, पुणे, औरंगाबाद, ठाणे व नागपूर या स्मार्टसिटींत समावेश असलेल्या शहरांमध्ये महाआयटीतर्फे बसविले जात असलेले सीसीटीव्ही चिनी कंपनीचे असल्याची बाब समोर आल्याने महाराष्ट्रात भाजप अडचणीत सापडला आहे.

हेही पाहा> ह्रदयद्रावक "...पण पप्पा तर खूप दूर निघून गेले" या वाक्याने सर्वांचेच पाणावले डोळे