मराठा आरक्षण आंदोलनात आता भाजप सहभागी; आमदार हिरेंची माहिती

seema hiray
seema hirayesakal
Updated on

नाशिक : महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण (maratha reservation) मिळावे, यासाठी कायदेशीर लढाईत कच खाल्ल्याने आरक्षणासाठी समाजाकडून आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यात भारतीय जनता पक्षाचा (BJP) प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल, अशी माहिती आमदार सीमा हिरे (mla seema hiray) यांनी निवेदनाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे. (BJP in Maratha reservation movement)

आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरू

आरक्षण हा राज्यातील मराठा समाजाच्या विकासाचा व समाजातील तरुणांच्या भवितव्याचा मुद्दा असतानाही महाविकास आघाडी सरकारने कायदेशीर लढाईत कुचराई केल्याचा आरोप आमदार हिरे यांनी केला. फडणवीस सरकारने या मुद्द्यावर घटनात्मक कार्यवाही करून दिलेल्या आरक्षणाबाबत सरकारने ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे यापुढे आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या नावाने व नेतृत्वात जी आंदोलने होतील, त्यामध्ये भाजप कार्यकर्ते पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होतील, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यात होणाऱ्या आंदोलनांमध्ये भाजपचे कार्यकर्ते सहभागी होतील. आरक्षणाचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा भाजपचा निर्धार आहे, असेही भाजप आमदार हिरे यांनी पत्रकात म्हटले आहे.

seema hiray
व्हेंटिलेटर बसविणाऱ्या ठेकेदारानेच केले हात वर! महापालिका कायदेशीर कारवाई करणार?

सरकारची मानसिकता नाही

मराठा समाजाला आरक्षण देण्याची आघाडी सरकारची मानसिकता नाही, समाजाची फसवणूक होत आहे. ठाकरे सरकारने फसवणूक थांबवावी व समाजास न्याय मिळावा, यासाठी सरकारला जागे करणे गरजेचे आहे. त्यासाठी होणाऱ्या प्रत्येक राज्यव्यापी आंदोलनांत भाजपचा सक्रिय सहभाग राहील. राज्यातील मागासवर्गीय आयोगाची मुदत संपल्यानंतर नवा आयोग स्थापन करण्यातही महाविकास आघाडी सरकार चालढकल करत असून, त्यावरूनच आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची नकारात्मक मानसिकता स्पष्ट होते. वेळकाढूपणा करून मराठा समाजाचा प्रक्षोभ शांत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव हाणून पाडला जाईल, असा इशारा आमदार हिरे यांनी दिले.

seema hiray
आपच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींना केले आवाहन; पाहा व्हिडिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com