व्हेंटिलेटर बसविणाऱ्या ठेकेदारानेच केले हात वर! महापालिका कायदेशीर कारवाई करणार?

ठेकेदाराने लॉकडाउन(Lockdown)चे कारण देत स्थानिक पातळीवर व्हेंटिलेटर बसून घेण्याचा सल्ला महापालिकेला दिल्याने आता महापालिका कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
hospital ventilators
hospital ventilatorse-sakal

नाशिक : पी एम केअर फंडातून(PM care fund) महापालिकेला पुरवण्यात आलेल्या व्हेंटिलेटरचे(Ventilator) ऑडिट करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेने पडून असलेले साठ व्हेंटिलेटर बसवण्यासाठी(Ventilator fitting) ठेकेदाराकडे तगादा लावला, मात्र ठेकेदाराने लॉकडाउन(Lockdown)चे कारण देत स्थानिक पातळीवर व्हेंटिलेटर बसून घेण्याचा सल्ला महापालिकेला दिल्याने आता महापालिका कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.(Contractor refuses to install ventilator due to lockdown)

ठेकेदाराचा अजब सल्ला!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हेंटिलेटरची गरज लक्षात घेऊन गेल्या वर्षी केंद्र सरकारने पी एम केअर फंडातून(PM care fund) महापालिकेला 35 व्हेंटिलेटर दिले होते. त्यानंतर मागील महिन्यात नव्याने 60 व्हेंटिलेटर महापालिकेला प्राप्त झाले. परंतु कनेक्टर(Connector), टूबीन(Tubin) हे सुटे भाग मिळत नसल्याने व्हेंटिलेटर सुरू झाले नाही त्यातही तंत्रज्ञ(Technician) उपलब्ध होत नसल्याचे कारण देत व्हेंटिलेटर धूळ खात पडून आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने पाठपुरावा करत ठेकेदार कंपनीशी संपर्क साधला. आता केंद्र सरकारने व्हेंटिलेटरचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्यानंतर महापालिका अडचणीत येण्याची शक्यता लक्षात घेऊन पुन्हा संपर्क साधण्यात आला. परंतु संबंधित ठेकेदाराने नकार देताना स्थानिक पातळीवर साठ व्हेंटिलेटर बसून घेण्याचा अजब सल्ला दिला. त्यामुळे महानगरपालिका आता कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात ठेकेदारास सोबत झालेल्या कराराची कागदपत्रे तपासून पाहिली जात आहे.

hospital ventilators
पेशींमध्येच कोरोनाला संपवणारं 2 DG औषध नेमकं कसं आहे?
hospital ventilators
बिटको रुग्णालयातील दुरावस्था पुन्हा चर्चेत; तोडफोडीनिमित्त खदखद चव्हाट्यावर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com