ठाकरे बंधूंच्या युतीनंतर पेढे वाटले, आज भाजपमध्ये प्रवेश करणार; पण भाजपच्याच आमदाराचा कडाडून विरोध

Nashik News : नाशिकमध्ये भाजपला विरोध करणाऱ्या नेत्याचा पक्ष प्रवेश होत असून यावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी नाराजी व्यक्त केलीय. यानंतर नाशिकमधील भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केलीय.
Nashik BJP Sees Internal Rift Over New Party Induction

Nashik BJP Sees Internal Rift Over New Party Induction

Esakal

Updated on

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर पक्षबदलाचे वारेही वाहू लागले आहेत. नाशिकमध्ये आता एका नेत्याच्या प्रवेशावरून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. भाजपचा सुपडा साफ होईल म्हणणाऱ्या नेत्यालाच भाजपमध्ये घेण्यात आलंय. तसंच महापालिकेवर भाजपचा भगवा फडकेल अशी प्रतिक्रिया नेत्यानं दिलीय. विनायक पांडे असं नेत्याचं नाव असून ते आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com