Nashik News: मताधिक्य 28 वरून 50 टक्के नेण्याचे उद्दिष्ट : विनोद तावडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vinod tawade

Nashik News: मताधिक्य 28 वरून 50 टक्के नेण्याचे उद्दिष्ट : विनोद तावडे

नाशिक : राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस समवेत शिवसेनेने जुळवून घेतल्याने त्यांच्याकडील हिंदुत्वाचे मते भारतीय जनता पक्षाकडे वळविण्याबरोबरच आगामी

लोकसभा निवडणुकीत भाजपचे (BJP) मताधिक्य २८ टक्क्यांवरून ५० टक्के वर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले. (BJP national general secretary Vinod Tawde statement about Majority of votes upcoming Lok Sabha elections nashik news)

भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने श्री. तावडे यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्य समितीमध्ये स्वाभाविकपणे आलेल्या कार्यकर्त्यांसमोर आता जे लक्ष आहे.

त्यात मतांची टक्केवारी आहे. सन २०१४ मध्ये ज्यावेळी सगळे पक्ष वेगवेगळे लढले त्यात भाजपला २८ टक्के मते पडली. शिवसेनेला १९ टक्के, काँग्रेसला १८ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला १७ टक्के मते पडली. शिवसेनेने राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सरकारमध्ये बसले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्याने हिंदुत्वाची जी मतं त्यांच्याकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांमुळे होती ती काँग्रेस बरोबर गेल्यानंतर जी हलायला लागली आहे. ती भाजपकडे वळवण हे उद्दिष्ट भाजपसमोर आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब कल्याणाचे विषय मार्गी लावतात, त्यामुळे परंपरेने काँग्रेस किंवा काही प्रमाणात राष्ट्रवादीकडे जी असणारी मत होती ती काही मत या ठिकाणी भाजपकडे वळविण्याचे नियोजन महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांसमोर आहे. यात यशस्वी होतील ही पण मला खात्री आहे.

विशेष मतदारासंघावर विशेष लक्ष

लोकसभा प्रवास योजनेंतर्गत केंद्राच्या योजनेत महाराष्ट्रातले जे वेगवेगळे मतदार संघ घेतलेले आहेत, त्यावर विशेष लक्ष दिले जाईल. त्यामुळे ती संख्या भाजपचे लोकसभेतील मताधिक्य वाढविण्यात उपयोगी पडेल. भाजपला आपली मतं २८ टक्क्यांवरून पन्नास टक्केपर्यंत न्यायची असल्याचे श्री तावडे म्हणाले.