Latest Marathi News | ओझर येथे भारत पेट्रोलपंपावर BMW गाडी बर्निंगचा थरार! पोलीस अनभिज्ञ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Burned BMW

Nashik News : ओझर येथे भारत पेट्रोलपंपावर BMW गाडी बर्निंगचा थरार! पोलीस अनभिज्ञ?

ओझर (जि. नाशिक) : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील जनार्दन स्वामी आश्रमाच्या समोर असलेल्या भारत पेट्रोलियमच्या पंपावर काल शुक्रवारी रात्री एका कारला अचानक लागलेल्या आगीत कारचे मोठे नुकसान झाले असुन या संदर्भात ओझर पोलिस ठाण्यात कुठली ही तक्रार दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले एवढी मोठी घटना घडूनही पोलीसात काहीही माहिती नाही याबदल मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे. (BMW Car Burning on Bharat petrolpump at Ozhar nashik Latest Marathi News)

शुक्रवारी रात्री सव्वा नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास पिंपळगांव बसवंत येथुन नाशिककडे जात असलेल्या बी एम डब्लू कारने (एमएच 43 ए ए 9007) इंधन भरण्यासाठी सर्व्हिस रोडवरील भारत पेट्रोलियमच्या पंपावर प्रवेश केला असता या कारच्या पुढील बाजूने धूर येत असल्याचे व इंजिनखाली आग लागल्याचे पेट्रोल पंप मालक व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले तेंव्हा पेट्रोल पंपावरील कर्मचारी हिरामण वालझाडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता कारचालकास कार पुढे घेऊन जाण्यास सांगून पंपासमोर बाजूला थांबवली दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी एच ए एल अग्निशामक दलास पाचारण केले एच ए एलअग्निशामक दलाचे कर्मचारी व बंब पोहचेपर्यंत कारने पेट घेतला व आगीने रौद्ररूप धारण केले होते.

एच ए एलचे फायर इन्स्पेक्टर प्रदीप आहेर फायरमन ललित केदार ,रोहन हिरे , घुमरे, अनिल भालेराव, प्रदीप मोटकरी यांनी पाण्याचा वापर केला गाडीचा बोनेटलॉक असल्यामुळे ते तोडण्यात आले त्यानंतर आग विझवण्यात आली हा प्रकार कारच्या डिझेल टाकीचे झाकन उघडण्याआधीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.दरम्यान कारचालक व त्यांच्या बरोबरच्या लोकांनी पेट्रोल पंप मालकाकडे कार जळाल्याबद्दल भरपाई म्हणून मोठी रक्कम मागितली होती पण मालकाने त्यांना धुडकावून लावले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी कडून समजते.

यावेळी पेट्रोलपंपावर नागरिकांची गर्दी झाली होती. कार चालक व मालकाने कार आगी बाबत पोलिसात तक्रार न दिल्याने की पोलीसांनीच घटनेची नोंद केली नाही किंवा गांभिर्य घेतले नाही याबाबत परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे

टॅग्स :NashikcarFire Accident