Nashik News: युवकाच्या मृत्यूने गावकरी संतप्त; घातपाताचा संशय, शेततळ्यात आढळला मृतदेह

Sagar Kande & Villagers agitation
Sagar Kande & Villagers agitationesakal

Nashik News : तालुक्यातील बोलठाण जातेगांव रस्त्या लगत असलेल्या सि. के. पाटील कृषी तंत्र विद्यालय द्वितीय वर्षासाठी शिक्षण घेत असलेल्या तालुक्यातील जळगाव बुद्रुक  येथील सागर म्हसु कांदे ( वय २० ) शाळेच्या आवारातील शेततळ्यात पडून मृत्यू झाला. (Body of 20 year old college student found in farm pond in Bolthan angry villagers Block path of sambhajinagar road nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sagar Kande & Villagers agitation
Beed Crime : ‘जिजाऊ’ घोटाळा; योगेश करांडेला अटक, चार दिवसांची मिळाली पोलिस कोठडी

मात्र सागरचा मृत्यू नेमके कशामुळे झाला हे विद्यालयाचे व्यवस्थापन स्पष्टपणे सांगत नसल्यामुळे संतापलेल्या जळगाव बुद्रुक येथील वडील नांदगावच्या गंगाधरी बायपास जवळ मयत सागरचा मृतदेह रस्त्यावर ठेवत रास्तारोको केले.

जातेगाव  येथील शेती महाविद्यालयात शिकणारा जळगाव बुद्रुक येथील वीस वर्षीय विद्यार्थ्याचा शेततळ्यात मृतदेह आढळला. संतप्त गावकऱ्यांनी नांदगाव येथील गंगाधरी बायपासला मृत विद्यार्थ्याचे पार्थिव रस्त्यावर ठेवून रास्तारोको केला. पोलीसांनी गुन्हा नोंदवून घेताना आक्समिक मृत्यूची नोंद घेण्याची तयारी दाखविली.

मात्र संबंधित शेतकी कॉलेजवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी संतप्त गावकऱ्यांचे हे आंदोलन केले. तीन तासाहून अधिक काळ चाललेल्या आंदोलनामुळे संभाजीनगर चाळीसगाव कडची वाहतूक कोंडी झाली अनेक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गुन्हा नोंदविल्याशिवाय जागेवरून प्रेत हलविणार नाही यावर गावकरी ठाम होते. शेवटी या विद्यालयाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करीत असल्याची भूमिका पोलिसांनी घेतली.

Sagar Kande & Villagers agitation
Ahmednagar Crime News : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर खुनी हल्ला, भाजप नगरसेवकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा; चौघे ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com