esakal | Nashik | बापा देखत वाहून गेलेल्या सौरभचा 2 दिवसानंतर मिळाला मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

body of the drowned boy was found two days later

बापा देखत वाहून गेलेल्या सौरभचा 2 दिवसानंतर मिळाला मृतदेह

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहराजवळील टेहरे शिवारातील गिरणा नदीपात्रातील भगवान वीर एकलव्य दंडनायक पुलाजवळ बाप व चुलत्या समवेत ट्रक धुण्यासाठी नदीपात्रात गेलेला सौरभ (वय ११) बाप व चुलत्याच्या डोळ्यादेखत नदीपात्रात वाहून गेला होता. गुरुवारी (ता.३०) सायंकाळी हा प्रकार घडला होता. दोन दिवसानंतर शनिवारी (ता.२) सकाळी गिरणा नदी पात्रातील सवंदगाव शिवारात त्याचा मृतदेह मिळून आला.


वडील अविनाश बच्छाव (रा.टेहरे) हे मुलगा सौरभ व भावासह नदीकाठावर ट्रक धुण्यासाठी गेले. ट्रक धुवत असतानाच दोघांच्या डोळ्यादेखत सौरभ पाय घसरून पडल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. बाप व चुलत्याचा सौरभला वाचविण्याचा प्रयत्न अपयशी ठरला होता. सौरभला शोधण्यासाठी दोन दिवसांपासून अग्निशमन दल अधीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शकील अहमद ऊर्फ तैराक, विकास बोरगे, कृष्णा कोळपे, राहुल जाधव, निजाम शेख, शकील अहमद शेख आदी अग्निशामक दलाचे जवान नदी काठावरील स्थानिक ग्रामस्थांसह परिश्रम घेत होते. शुक्रवारी दिवसभर १२ तास शोध मोहीम राबवूनही सौरभ मिळून आला नव्हता. रात्री अंधार पडल्यानंतर अग्निशामकदलाच्या जवानांनाही शोध कार्यात अडथळे येत होते

हेही वाचा: कोटबेल येथे वृद्ध शेतकऱ्याचा खून; तब्बल आठ संशयितांना अटक

. शहर व परिसरात शनिवारी सकाळी जोरदार पावसातही शोध कार्य सुरु असतानाच सवंदगाव शिवारातील नदीपात्रात सौरभचा मृतदेह मिळून आला. सवंदगावचे पोलिसपाटील अमोल नवसरे यांनी पोलिसांना माहिती दिली. सौरभचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य अरुण पाटील व सौरभच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर गिरणा नदी तीरावरील टेहरे स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात सौरभवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा: कांदे-पोहे आणि खमंग चर्चा…

loading image
go to top