IPL 2022 चे प्लेऑफ वेळापत्रक जाहीर; कुठे असेल फायनल घ्या जाणून? | IPL Playoffs Schedule 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL Playoffs Schedule 2022

IPL चे प्लेऑफ वेळापत्रक जाहीर; कुठे असेल फायनल घ्या जाणून?

IPL 2022 Playoffs Schedule: बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल 2022 चे प्लेऑफ वेळापत्रक जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार अहमदाबाद आणि कोलकाता मे महिन्यात आयपीएल 2022 च्या प्लेऑफचे आयोजन केले आहे. गांगुलीने सर्व प्लेऑफ सामने 100% प्रेक्षकांसह खेळवले जातील अशी घोषणाही केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सर्वोच्च परिषदेने हा निर्णय घेतला आहे.(IPL 2022 Playoffs Schedule)

हेही वाचा: IPL 2022: स्टँडमध्येच नाचायला लागली हार्दिक पांड्याची पत्नी; पाहा Video

क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर सामने कोलकाता येथे आयोजित केले जातील. क्वालिफायर-1 24 मे रोजी खेळवला जाईल आणि 26 मे रोजी एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. यानंतर क्वालिफायर-2 अहमदाबादमध्ये 27 मे रोजी होणार असून अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. स्टेडियमच्या क्षमतेनुसार, चारही सामन्यांदरम्यान 100 टक्के प्रेक्षक सामना पाहू शकतात. कोलकाता येथे 26 मे रोजी एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ दुसऱ्या दिवशी 27 मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर-2 मध्ये खेळण्यासाठी सुमारे 1900 किलोमीटरचा प्रवास करणार आहे.(IPL 2022 Playoffs Schedule)

हेही वाचा: IPL SRH: काव्या मारन गदगदली, डान्सचा व्हिडिओ व्हायरल

आयपीएल 2019 (IPL) नंतर ही पहिलीच वेळ असलं की भारतातील स्टेडियममध्ये 100 टक्के प्रेक्षक उपस्थित राहतील. कोरोनामुळे आयपीएल 2022 च्या सुरुवातीला 25% प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी होती, जी नंतर 50 टक्के करण्यात आली होते.

Web Title: Ipl 2022 Playoff Schedule Bcci Released Kolkata Ahmedabad With Full Capacity Crowds Cricket News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top