Bogus Medical Certificate Case : संशयित डॉ. सैंदाणेंना अक्कलकुव्यातून अटक

Fake Medical Certificate case
Fake Medical Certificate caseesakal

नाशिक : आंतरजिल्हा बदल्यांसाठी पोलिस कर्मचाऱ्यांना बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणात पसार असलेल्या डॉ. स्वप्नील सैंदाणे यांना नाशिक तालुका पोलिसांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा हद्दीतून अटक केली आहे. डॉ. सैंदाणे यांनी सर्जन पदवी नसताना एमडी सर्जन असल्याचे भासवून पोलिस कर्मचाऱ्यांच्या आजारपणाच्या अहवालावर शिक्के दिले होते. (Bogus Medical Certificate Case Suspect Dr Saindane arrested from Akkalkuwa Nashik Latest Marathi News)

Fake Medical Certificate case
PFIच्या मालेगातील आणखी 2 कार्यकर्त्यांना अटक

आंतरजिल्हा बदल्यांसाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांप्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत नाशिक ग्रामीण मुख्यालयातील वरिष्ठ लिपिकासह जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमनला अटक करण्यात आली आहे. सातपूरच्या अशोकनगर परिसरात असलेल्या प्रभावती रुग्णालयाचे डॉ. स्वप्नील सैंदाणे, सिडकोतील सहजीवन रुग्णालयाचे डॉ. वीरेंद्र यादव, जिल्हा रुग्णालयाच्या रेकॉर्ड रुमचे लिपिक किशोर पगारे यांच्याही या गुन्ह्यात समावेश आहे.

परंतु तिघेही संशयित गुन्हा दाखल झाल्यापासून पसार आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या नाशिक तालुका पोलिसांच्या हाती संशयित डॉ. स्वप्नील सैंदाणे लागले. डॉ. सैंदाणे नंदुरबार जिल्ह्यात असल्याचे समजताच पथकाने त्यांना मंगळवारी (ता.२७) अक्कलकुवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. त्यांना बुधवारी (ता.२८) जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास व डॉ. निखिल सैंदाणे यांचीही नावे समोर आले आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात फेटाळण्यात आल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे समजते. याप्रकरणी बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवरही अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यासंदर्भात तालुका पोलिसांकडून लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

Fake Medical Certificate case
दसऱ्याच्या दिवशी गांधीनगरला 53 फुटी रावण दहन; यंदाचे 67 वे वर्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com