Nashik : बॉलिवूडच्या 'मॉडर्न गर्ल'वर गाणे विकण्याची वेळ

Acterss Smruti Biswas
Acterss Smruti Biswasesakal

नाशिक रोड : एकेकाळी बॉलिवूड (Bollywood) गाजविलेली मायानगरीची मॉडर्न गर्ल (Modern Girl) म्हणून ज्यांचा नावलौकिक होता अशा स्मृती बिश्वास नारंग (वय ९८) यांनी उदरनिर्वाहासाठी जुने रेकॉर्ड केलेले गाणे (Songs) विकायला काढले आहे. आवाक्याबाहेर असणारा वैद्यकीय खर्च (Medical expenses) आणि उदरनिर्वाह यासाठी आपण नामवंत गायकांनी गायलेली गाणी विकत आहोत, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. (Bollywood Modern Girl vetern actress Smruti Biswas family facing financial crisis Nashik News)

९८ वर्षांच्या अभिनेत्री स्मृती अभिनेत्री स्मृती बिश्वास नारंग यांनी १९३० ते १९६० चे हिंदी फिल्मी दुनियेतील १०० चित्रपटांहून अधिक चित्रपट गाजविले. स्मृती बिश्वास-नारंग सध्या कौटुंबिक, सामाजिक व वैद्यकीय समस्येत सापडल्या आहेत. १९३० ते ६० च्या दशकामध्ये कलकत्ता, लाहोर, मुंबई असा प्रवास करून १०० पेक्षा अधिक चित्रपटांत मुख्य नायिका व इतर खलनायिका अशी विविध पात्रे करून नावलौकिक मिळविलेल्या ९८ वर्षीय स्मृती बिश्वास नारंग सध्या नाशिक रोड येथील चव्हाण मळ्यात राहतात. सध्या त्यांना स्वतःच्या मालकीचे छपर नाही. त्या भाड्याच्या घरात राहत असून, आपला मुलगा राजीवबरोबर त्या हालअपेष्टा, आर्थिक अडचणी व दारिद्र्य सहन करत दिवस काढत आहेत. त्यांना गरज आहे दानशूर हातांची आणि आधाराची.

उदरनिर्वाहासाठी त्यांनी बप्पी लाहिरी, अनुराधा पौडवाल, साधना सरगम यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेली गाणी विकायला काढली आहेत. त्यांचे दिवंगत पती डी. एस. नारायण यांचा चित्रपटनिर्मितीचा व्यवसाय होता. १९८६ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. दोन चित्रपट त्या काळात बनवायचे राहून गेले, त्या चित्रपटांसाठी त्या काळात त्यांनी रेकॉर्ड करून ठेवलेल्या ओरिजिनल गाण्यांच्या कॅसेट सध्या त्यांच्याकडे असून, नामवंत गायकांनी गायलेली जुनी गाणी बाजारात विकायला काढली आहेत.

Acterss Smruti Biswas
लग्न सराईला आता सरतीचे वेध; पावसाळीपूर्व कामांकडे वळला बळीराजा

शासनाकडून मदतीची अपेक्षा
हिंदी चित्रपट ‘हमसफर’, ‘हमदर्द’, ‘बाप रे बाप’, ‘भागंभाग’, ‘तलवार’, ‘अरब का सौदागर’, ‘चांदणी चौक’, ‘जागते रहो’, ‘अपराजिता’, ‘अभिमान’, ‘नेक दिल’ अशा १०० हून अधिक चित्रपटांत नावाजलेल्या भूमिका केलेल्या आहेत. देवानंद, राज कपूर, अशोक कुमार, राजकुमार, प्रेमनाथ, भारत भूषण, किशोर कुमार, गुरू दत्ता, जॉनी वॉकर, नाना भट, व्ही. शांताराम, बी. आर. चोप्रा, संतोषी, विमल रॉय, जॅकी माहेश्वरी, हेमामालिनी, शत्रुघ्न सिन्हा, सलमान खानची आई सलमा खान, अमिताभ बच्चन अशा दिग्गजांरोबर काम केलेल्या स्मृती यांच्या वैद्यकीय व उदरनिर्वाहाच्या खर्चाची जबाबदारी शासनाने उचलावी, अशी मागणी कला क्षेत्रातून होत आहे. नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी स्मृती बिश्वास नारंग यांचा आवाज शासनव्यवस्थेसमोर मांडावा, अशी अपेक्षा नाशिककरांमधून व्यक्त केली जात आहे.

Acterss Smruti Biswas
Nashik : 'अनाथाचे नाथ' बनले कळमदरी गाव!

"सध्या वैद्यकीय आणि उदरनिर्वाहाचा खर्च परवडत नाही म्हणून आम्ही चित्रपटासाठी रेकॉर्ड करून ठेवलेली गाणी विकण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या सांस्कृतिक विभागाने माझ्या आईचे पालकत्व स्वीकारावे, अशी अपेक्षा आहे." - राजीव नारंग, मुलगा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com