
शेततळ्यात पडून धोडंबेत मुलाचा मृत्यू
सोग्रस (जि. नाशिक) : चांदवड तालुक्यातील धोडंबे येथे शेततळ्यात पाय घसरून पडल्याने पुष्कराज बापू रकिबे (वय १४, रा. धोडंबे, ता. चांदवड) या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. ३) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. (boy died after falling in farm pond in dhodambe nashik Latest Marathi News)
हेही वाचा: प्रमोद महाजन उद्यानाची भिंत कोसळली
पुष्कराज सायंकाळी धोडंबे शिवारातील कैलास गवळी यांच्या शेततळ्याजवळून जात होता. त्यावेळी अचानक त्याचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला. पुष्कराज शेततळ्यात पडल्याचे काही ग्रामस्थांच्या लक्षात येतात त्यांनी त्यास बाहेर काढून त्वरित धोडंबे रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी पुष्कराजला तपासून मृत घोषित केले. धोडंबे येथील पोलिसपाटील गंगाधर उशीर व पुष्कराजच्या नातेवाईकांनी त्यास वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.
गुरूवारी शवविच्छेदन झाल्यानंतर सकाळी नऊला त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यासंदर्भात वडनेर भैरव पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री. दोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहे.
हेही वाचा: Nashik : अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा संशयित जेरबंद
Web Title: Boy Died After Falling In Farm Pond In Dhodambe Nashik Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..