Nashik : अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा संशयित जेरबंद | latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik crime News

Nashik : अल्पवयीन मुलीशी विवाह करणारा संशयित जेरबंद

ओझर (जि. नाशिक) : अल्पवयीन मुलींना आमिष दाखवून जाळ्यात ओढून भेट मध्य प्रदेश व इतर राज्यात विक्री करणाऱ्या टोळीच्या मुस्कान ऑपरेशनच्या अंतर्गत तपासात एप्रिल महिन्यात बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीस मध्य प्रदेशच्या मंगरूल (जि. खरगोण) गावातून पोलिसांनी तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका आरोपीस अटक केली.

या टोळीत आणखी काही व्यक्तींचा समावेश असून, पोलिस त्यांच्या मागावर आहेत. आत्तापर्यंत पोलिसांनी तीन महिला आणि मध्य प्रदेशमधील तीन पुरुष, असे सहा संशयित जेरबंद करण्यात यश आले आहे. (Suspect who married minor girl jailed Nashik crime Latest Marathi News)

मुस्कान ऑपरेशन यशस्वी होत असून अपहरण करण्याच्या गुन्ह्यांची व्याप्ती वाढत असून जिल्हयातील या पुर्वीचेही अपहरणाचे धागेदोरे लागण्याची शक्यता वर्तवली जात असून ओझर पोलीस व गुन्हे शोध पथकाची कामगीरी स्पृहणीय असून ओझरच्या पोलीस ठाण्याच्या कारकीर्दीतील ही मोठी यशस्वी कारवाई ठरली असून बाजीगर पोलीस कर्मचाऱ्यांच्या या धाडसी कारवाई बदल सर्वत्र कौतुक होत आहे.

ओझर मधील भगतसिंगनगरामधून अपहरण झालेल्या तेरावर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या प्रियंका देवीदास पाटील ऊर्फ प्रियंका पानपाटील हिला ओझर पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर लहान मुलीचे अपहरण करणाऱ्या टोळीचा छडा पोलिसांनी नवख्या राज्यात प्रतीकुल परिस्थितीशी संघर्ष करत मोठ्या शिताफीने नऊ दिवसांतच लावला.

अपहरणकर्त्या टोळीने अपहरण केलेली ओझरमधील पहिली मुलगी शोधून काढल्यानंतर या टोळीच्याच चौकशीत त्यांनी आणखी नाशिकमधील एका अल्पवयीन मुलीची मध्य प्रदेशात विक्री केल्याचे उपडीस आले. या टोळीने मध्य प्रदेशातील अरुण ताराचंद सालवे (२८, रा. मंगरूळ) यांस लग्नासाठी मुलगी विकल्याची कबुली दिली.

ओझर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणपत जाधव, पोलिस दुर्गेश बैरागी, रावसाहेब मोरे, अमोल सूर्यवंशी, एकनाथ हळदे,महिला पोलिस कर्मचारी गांगवे यांच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने मध्य प्रदेशातील मंगरूळ गांवातील पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करीत तिला ताब्यात घेत आरोपी अरुण ताराचंद सालवे यास अटक केली,

पोलिसांनी शोधलेली ही दुसरी पीडित मुलगी अल्पवयीन असून, तिच्यासोबत संशयित आरोपी असावे या पिडीत मुलीशी अरूण सालवे याने बेकायदेशीरपणे लग्न केले. या मुलीला गुन्ह्यातील संशयित आरोपी प्रियंका पानपाटील आणि सुरेखा भिल या दोघींनी काम मिळवून देते, असे आमिष दाखवत पळवून नेले होते.

याबाबत आरोपी अरण सालवे, प्रियंका पानपाटील, सुरेखा भिल या तिघांविरोधात पोलीस ठाण्यात अपहरणासह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोस्को) आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलिस करीत आहे.

टॅग्स :NashikCrime Against Girl