नाशिकमध्ये 'सैराट'; बहिणीच्या प्रियकराचा खून

नाशिकमध्ये 'सैराट'; बहिणीच्या प्रियकराचा खून

नाशिक : सैराट चित्रपटात दाखवलेल्या हत्येसारखाच प्रकार नाशिकच्या भद्रकाली परिसरात घडला. प्रेम प्रकरणाच्या संशयातून एका तरुणीच्या भावाने धारदार शस्त्राने वार करत बहिणीच्या प्रियकराचा खून केला. ही घटना रात्री बाराच्या सुमारास घडली. या घटनेनंतर हल्लेखोर फरार आहे.

प्रेम प्रकरणातून झालेल्या वादानंतर अनेक गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता नाशिकमध्येही अशीच गंभीर घटना घडली आहे. एका तरुणीच्या भावाने आपल्या मित्रांच्या साहाय्याने बहिणीचा प्रियकर विवेक शिंदे या तरुणाचा खून केला आहे. या तरुणीचा भाऊ शंभू जाधव आणि त्याच्या मित्रांनी मिळून हे कृत्य केले आहे. त्यांनी विवेक शिंदे याचा धारदार शस्त्राने वार करत खून केला. यातील सर्व आरोपी सध्या फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भद्रकाली पोलिसांकडून सुरू आहे.

एका गुन्ह्यातून निर्दोष

यातील आरोपी हे काही दिवसांपूर्वीच खुनाच्या गुन्ह्यात निर्दोष सुटले होते. त्यानंतर आता त्यांनी हा गुन्हा केला आहे. सध्या त्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com