नाशिक: इतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झालेल्या असताना औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदवी अभ्यासक्रम (बी. फार्मसी)च्या प्रवेशाला मुहूर्त लागलेला नाही. वारंवार मुदतवाढीचा सोपस्कार पार पाडताना संपूर्ण प्रवेशप्रक्रियेचा खेळखंडोबा केला आहे. आता सुधारित वेळापत्रकानुसार मंगळवार (ता. २)पर्यंत नोंदणी मुदत दिली आहे.