ZP च्‍या शाखा अभियंत्‍यास दीड लाखांची लाच स्‍वीकारतांना अटक

bribe (लाच)
bribe (लाच)esakal
Updated on

नाशिक : जिल्‍हा परिषदेतील (ZP) पाणीपुरवठा विभागाच्‍या शाखा अभियंत्‍याला लाच स्‍वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. ३) रंगेहाथ पकडले. कामाच्‍या टक्‍केवारीच्‍या मोबदल्यात दीड लाख रुपयांची लाच घेताना सापळा रचून अटक करण्यात आली.
अमोल खंडेराव घुगे असे लाचखोर अभियंत्‍याचे नाव आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

तक्रारदार हा शासकीय स्थापत्य कंत्राटदार आहे. त्यांनी मौजे पाथरे (ता. सिन्नर) परिसरात नळ पाणीपुरवठ्याचे काम केले आहे. या कामाकरिता ४८ लाख रुपयांचे देयक तयार केले. बिल मंजूर करण्याच्‍या मोबदल्‍यात घुगेने ४ टक्‍के अर्थात एक लाख ९० हजार रुपयांची लाच मागितली होती.

bribe (लाच)
जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या बदल्या; कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

तडजोडीनंतर ३ टक्‍के म्‍हणजेच दीड लाख रुपये रक्‍कम कार्यालयात स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी व उपअधीक्षक अभिषेक पाटील, हवालदार सुकदेव मुरकुटे, पोलिस नाईक मनोज पाटील यांनी केली.

जिल्‍हा परिषदेत भ्रष्टाचाराचा विळखा
यापूर्वी जिल्हा परिषदेच्या तत्‍कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्‍याकरिता लाच स्‍वीकारताना चालकाला ठाण्यातील पथकाने सापळा रचून पकडले होते. या प्रकरणी श्रीमती झनकर यांच्‍यावर कारवाई करण्यात आली होती. त्‍यानंतर आता घुगेलाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत अटक केल्‍याने यानिमित्त जिल्‍हा परिषदेला भ्रष्टाचाराचा विळखा असल्‍याची चर्चा सुरू झाली आहे.

bribe (लाच)
नाशिक : दिंडोरीत सातव्या जिल्हा परिषद गटाची निर्मिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com