Nashik : पंचनामे होऊनही 3 हजार शेतकऱ्यांच्या भरपाईला ब्रेक

Farmer
Farmeresakal

येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावातील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल तीन कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईला ब्रेक लागला आहे. यामुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना मिळणाऱ्या थोड्याफार भरपाईवर पाणी फिरले आहे.

तालुक्यात जूनला रुसलेला पाऊस टप्प्याटप्प्याने पडत गेला. मात्र ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाने तालुक्याच्या पाटोदा, शिरसगाव लौकी, मुखेड परिसरात पिकांची वाट लावली होती. काही शेतकऱ्यांनी तर या पावसाने खराब झालेल्या मकाची शेती नांगरूनही टाकली होती. या शिवाय तालुक्याच्या विविध भागातही नियमित पडलेल्या पावसाने मका, सोयाबीन, मुगाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होते.

(Break in the compensation of three thousand farmers despite investigation nashik )

Farmer
Nashik : शेतमाल विक्रीसाठी तारेवरची कसरत; कुंदर वस्ती शिवारातील विदारक चित्र

तालुक्यातील मुखेड, शिरसगाव, पाटोदा परिसरात १२ गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे रस्ते उद्ध्वस्त झाले असून शाळेच्या इमारती तसेच घरांचे देखील प्रचंड नुकसान झाले होते. या ठिकाणी नुकसानीची पाहणी करून शासनाने तातडीने भरीव मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. पिके जोमाने येत असतानाच हे नुकसान झाल्याने कोट्यवधीचा फटका शेतकऱ्यांना बसला. किंबहुना त्यानंतर मका, कपाशीवर विविध रोगाचाही प्रादुर्भाव होऊन उत्पन्नात मोठी झळ बसणार आहे.

शासनाच्या सूचनेनुसार महसूल व कृषी विभागाने ऑगस्टमधील पावसाने नुकसान झालेल्या १६ गावातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून तसा अहवालही शासनाला पाठविला होता. मात्र,अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी ३३ टक्क्यांवर शेती पिकांचे नुकसान आणि २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस पडलेला हवा या निकषामुळे तालुक्यातील शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आहे. मुळात पाऊस ६५ मिलिमीटर नसला तरी तो सलग चार ते पाच दिवस विविध भागात कमी जास्त प्रमाणात पडत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र निकषामुळे हे नुकसान होऊनही शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत.

Farmer
Nashik : डाऊनी कोबीच्या मुळावर शेतकऱ्यांची चिंता वाढली

ऑगस्टमधील नुकसानीसाठी शासनाने जिल्ह्यासाठी सुमारे अकरा कोटीचा निधी दिला आहे. यात दहा तालुक्यांचा समावेश असून उर्वरित पाच तालुके मात्र ६५ मिलिमीटरच्या निकषामुळे बाद झाले आहे. यात येवल्यालाही मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने तब्बल १६ गावातील ३ हजार ७८ शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे केले होते. यात ३३ टक्क्यांच्या वर तब्बल २ हजार ४८ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचे या अहवालात नमूद केले होते. तसा अहवालही शासनाकडे पाठविण्यात आला होता. या नुकसानी पोटी शासनाच्या नव्या दरानुसार तब्बल २ कोटी ७८ लाख रुपयांची मदत तालुक्यातील ३ हजार शेतकऱ्यांना मिळाली असती. मात्र निकषामुळे प्रस्ताव पाठवूनही या मदतीला ब्रेक लागला असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीला मदत देताना पावसाच्या ६५ मिलिमीटरचा निकष न लावता उभ्या पिकांची लागलेली वाट, त्यामुळे झालेले नुकसान विचारात घ्यायला हवे अशी मागणी होत आहे. अनेकदा ६५ मिलिमीटर पेक्षाही जास्त पाऊस होतो पण नुकसान मात्र होत नाही आणि अनेकदा पाऊस पाच- सात दिवसापर्यंत २० ते ४० मिमीपर्यत कमी अधिक प्रमाणात सुरू राहतो. त्यामुळे जमिनीतील पाण्याचा निचरा होत नाही आणि मुळे

सडून पिकांचे मोठे नुकसान होते. या वास्तव परिस्थितीचा विचार करून निकषात बदल करण्याची मागणी ही शेतकरी करत आहेत.

माजी उपमुख्यमंत्री छगन भूजबळ यांनी राज्याचे सचिव असीम गुप्ता तसेच जिल्हाधिकारी गंगाधरण यांच्याशी संपर्क साधून पावसाच्या निकषाची व नुकसानीची वास्तव परिस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. आता झालेल्या पावसाचे सरसकट पंचनामे करून त्यांना भरपाई मिळवून द्यावी अशी सूचना त्यांनी केली आहे. निकषात बदल व्हावा, यासाठी श्री. भूजबळ स्वतः पाठपुरावा करत आहे.

- बाळासाहेब लोखंडे, भूजबळ संपर्क कार्यालय प्रमुख, येवला

ऑगस्टमध्ये तालुक्यात पाटोदा, धुळगाव परिसरात ढगफुटी सदृश तर इतरत्र सततचा पाऊस झाल्याने अनेक हेक्टर मका, सोयाबीन, मुग आदी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. काही भागात फक्त पंचनामे झाले. परंतु धुळगावसह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे पंचनामे सुद्धा केले नाहीत तेव्हा आर्थिक मदत तर दूरच...शासनाने आत्तापर्यंतच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतक-यांना रब्बी पीक उभे करण्यासाठी तातडीने आर्थिक मदत करावी. फक्त घोषणांचा पाऊस नको.

- बापूसाहेब पगारे, नेते, शेतकरी संघटना, येवला

Farmer
IND vs AUS 3rd T20I : निर्णायक सामन्यावर फिरणार पाणी; हैदराबादमध्येही पावसाची शक्यता?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com