2 लाख 60 हजाराचा चुना लावून 10 दिवसात नवरी फरार | Nashik

Bride absconding in 10 days after Fraud of 2 lakh 60 thousand rupees Nashik News
Bride absconding in 10 days after Fraud of 2 lakh 60 thousand rupees Nashik Newsesakal

मालेगाव (जि. नाशिक) : लग्न जमविण्यासाठी दोन लाख ६० हजार रुपये घेऊन अवघ्या दहा दिवसात नवरीस पळवून लावत येथील जाजुवाडी भागातील योगेश दत्तात्रय पाटील या तरुणाची फसवणूक करणाऱ्या आठ जणांविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. १८ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२१ या कालावधीत भायगाव शिवार व पागलगिरी आश्रम, शिर्डी येथे हा प्रकार घडला.

Bride absconding in 10 days after Fraud of 2 lakh 60 thousand rupees Nashik News
Nashik | विजेच्या लपंडावाने पाणी असून खोळंबा

योगेशचा आशा अंबादास ढवळे या तरुणीशी विवाह झाला. घराबाहेर भांडी घासत असतानाच ती अचानक बेपत्ता झाली. लग्न लावण्याच्या मोबदल्यात दोन लाख ६० हजार रुपये घेऊन नवविवाहितेस पळवून लावत आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी रवींद्र येशीनाथ शेळके (रा. शेजवाळ, ता. मालेगाव), सुनील जिभाऊ पगार (रा. चिंचगव्हाण, ता. मालेगाव), संजय शिवसिंग चव्हाण (रा. भाऊसिंगपुरा, औरंगाबाद), पवार व कांबळे (दोघांची पूर्ण नावे माहित नाही), रामकृष्ण मोरे (रा. शिर्डी, जि. अहमदनगर) यांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Bride absconding in 10 days after Fraud of 2 lakh 60 thousand rupees Nashik News
पंचवटी विभागीय कार्यालयाकडून अतिक्रमण मोहीम | Nashik

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com