esakal | नाशिक : राम-सिता-लक्ष्मण शिल्पाचे पुलाअभावी दुरूनच दर्शन; पर्यटकांचा हिरमोड
sakal

बोलून बातमी शोधा

Ram-Sita-Lakshman Statue

नाशिक : राम-सिता-लक्ष्मण शिल्पाचे पर्यटकांना दुरूनच दर्शन

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : धार्मिक तिर्थक्षेत्र असलेल्या तपोवन येथील राम-सिता-लक्ष्मण शिल्पाकडे जाण्यासाठी तयार केलेला पूलच नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होतो आहे. येथे प्रशासनाने तयार केलेला लोखंडी पूलच पुरामुळे दिसेनासा झाल्याचे दृश्‍य आहे. आता याठिकाणी पूलच नसल्याने पर्यटकांना नदी ओलांडून शिल्पाकडे जाता येत नसल्याने देशभरातून तपोवनात येणाऱ्या पर्यटकांना राम-सिता-लक्ष्मण शिल्पाचे दर्शन दुरूनच घ्यावे लागत आहे.

गोदावरी नदीकाठी स्मार्टसिटीअंर्तगत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. तपोवनातही कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर घाट, पूल यांचे कामे झाली होती, परंतु त्यांची दुरवस्था झाली होती. प्रशासनाने डागडुजी करत पूल दुरुस्तही केला होता. हौशी पर्यटकांचे नेहमीच आकर्षण असलेल्या राम-लक्ष्मण, सिता शिल्पाकडे जाण्यासाठी या पुलाचा वापर केला जात होता. या शिल्पाजवळ जात पर्यटक फोटो शिल्पासोबत टिपत असतात, परंतु आता येथे जाण्यासाठी मार्गच नसल्याने भाविक अन्‌ पर्यटकांचा हिरमोड होत आहे.

हेही वाचा: भुजबळ-कांदे किरकोळ वाद; राष्ट्रवादी पाठीशी - जयंत पाटील

गर्दी कायम, मात्र हिरमोड

तपोवनात कपिला- गोदावरी संगम पाहण्यासाठी व धार्मिक तीर्थक्षेत्रावर दर्शनासाठी येथे पर्यटक व भाविकांची मोठी गर्दी असते. पर्यटक येथील अनमोल क्षणांच्या आठवणी मोबाईलमध्ये टिपत असतात. मात्र, गोदावरीला पाणी सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पूर आला. पूर आल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची संख्या तपोवनात वाढली आहे. येथील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या शिल्पाकडील पूलच वाहून गेल्यामुळे शिल्पाकडे जाता येत नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. शिल्पाकडे जाण्यासाठी बनवलेला पूल तात्पुरता न करता कायमस्वरूपी टिकेल अशा पद्धतीने करावा, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.

हेही वाचा: नाशिक : कालिकामाता मंदिरात टोकणशिवाय दर्शन नाही

loading image
go to top