नाशिक- बिऱ्हाड आंदोलक चर्चेसाठी मुंबईत जाऊनही आदिवासी विकासमंत्री प्रा. अशोक उईके यांची भेट झाली नाही. त्यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ व आमदार हिरामण खोसकर यांनी या विभागाच्या सचिवांसोबत चर्चा केली. मात्र, आंदोलनावर कुठलाही तोडगा न निघाल्याने ‘बिऱ्हाड मोर्चेकरी’ रस्त्यावर बसून आहेत.