नाशिक: उत्तराखंडातील रुडकी गावातील गेस्ट हाऊस स्वतः:च्या मालकीचे असल्याचे बनावट कागदपत्रांद्वारे भासविणाऱ्या मुंबईतील संशयित महिलेने नाशिकच्या ब्रोकरला तब्बल एक कोटींचा गंडा घातला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, संशयित महिला पसार झाली आहे.