BSc Nursing Admission
sakal
नाशिक: राज्यभर सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमासाठी नोंदणीची मुदत वाढविली आहे. येत्या ५ ऑक्टोबरपर्यंत पात्रताधारक विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रियेत सहभागासाठी नोंदणी करता येईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. प्रवेशासाठी असलेल्या निकषांमध्ये बदल जाहीर केले असून, यामुळे सीईटी दिलेले सर्वच विद्यार्थी आता प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.