

Buldhana Congress Leader Dies After Falling From Moving Train
Esakal
मुंबईहून चिखलीला निघालेल्या काँग्रेस नेत्याचा रेल्वेतून पडल्यानं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. पैठण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी आणि चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष डॉक्टर सत्येंद्र भुसारी असं मृत्यू झालेल्या नेत्याचं नाव आहे. १२ नोव्हेंबरला सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास कसारा स्थानकात ही दुर्घटना घडली.