esakal | लगीनसराईने सराफ व्यवसायिकांना तारले; बाजारात ३५ ते ४० कोटींची उलाढाल
sakal

बोलून बातमी शोधा

bullion market

लगीनसराईने सराफ व्यवसायिकांना तारले; बाजारात कोटींची उलाढाल

sakal_logo
By
युनूस शेख


जुने नाशिक : लॉकडाउनमुळे ठप्प झालेल्या सराफ व्यवसायास लगीनसराईने तारले. सुमारे ३० ते ३५ टक्के व्यवसाय लगीनसराईच्या खरेदीमुळे होऊ शकला. अनलॉक झालेल्या महिनाभराचा विचार केला, तर संपूर्ण सराफ बाजारात ३५ ते ४० कोटींची उलाढाल झाली आहे. सराफ व्यवसायावर अवलंबून जंगम व्यवसायिकांनादेखील दिलासा मिळाला आहे. (bullion market has a turnover of Rs 35-40 crore due to the wedding season)


लॉकडाउन काळात सराफ बाजारातील उलाढाल शंभर टक्के थांबली होती. महिनाभरापूर्वी अनलॉक झाल्यानंतर बाजार उघडला. अनलॉकहोऊन देखील व्यवसायात हवी तशी उभारी आली नव्हती. अशा वेळेस लग्नसराईचे काही मुहूर्त आल्याने सराफी व्यावसायिकांसाठी मोठी संधी ठरली. शहर-जिल्हा परिसरातील नागरिकांनी लगीन सराईच्या निमित्ताने वधू-वरांसाठी दागिने खरेदी करण्यासाठी गर्दी केली. त्यातून व्यवसायात पुन्हा एकदा उभारी मिळाली. त्यातच प्रशासनाने विवाहसोहळा साध्या पद्धतीने केवळ ५० वऱ्हाडी मंडळींमध्ये करण्याच्या सूचना केल्याने अनेकांकडून कमी खर्चात विवाह सोहळे संपन्न केले. उर्वरित रकमेतून सोने खरेदीमध्ये गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. भविष्यात हीच गुंतवणूक नवदाम्पत्यासाठी उपयोगी ठरणार आहे. चांदीपेक्षा सोन्याची मागणी अधिक असल्याचेही व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

विकेंड लॉकडाऊनचा परिणाम

शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग खरेदीसाठी बाहेर पडत असतो. लगीनसराई असलेल्या कुटुंबातील व्यक्तीदेखील याच दिवसांना पसंती देतात. प्रशासनाने मात्र या दिवसांना लॉकडाउनची सक्ती केल्याने सराफ बाजारातील खरेदी-विक्रीवर अधिक परिणाम झाला. सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसात होणारी खरेदी शनिवार, रविवार या दोनच दिवसात होत असते. लॉकडाउनमुळे ती खरेदी ठप्प झाली आहे.

हेही वाचा: परमवीर सिंगच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलीसाकडून गंभीर आरोपसराफ बाजार पूर्वीप्रमाणे पूर्वपदावर येण्यासाठी आणखी सुमारे सात ते आठ महिने लागणार आहे. नागरिक अकरा नंतरच खरेदीसाठी बाहेर पडत असतात. अशा वेळेस प्रशासनाकडून देण्यात आलेला चार वाजेची वेळ कमी पडते. शक्य झाल्यास प्रशासनाने वेळ वाढवून देण्यात यावी.
- गिरीश नवसे, अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन

जंगम व्यवसाय पूर्णपणे सराफ व्यवसायावर अवलंबून आहे. महिनाभरापासून सराफ बाजार सुरू झाल्याने पुन्हा एकदा रोजी-रोटीला सुरवात झाली आहे. आता पुन्हा लॉकडाउन करू नये, अन्यथा उपासमारीची वेळ येईल.
- गणेश जंगम, जंगम व्यवसायिक

(bullion market has a turnover of Rs 35-40 crore due to the wedding season)

हेही वाचा: मालेगाव उपविभागात ४३ टक्के पेरण्या; पावसाअभावी कामे रखडली

loading image