नाशिक : विनापरवानगी बैलगाडा शर्यत, माजी आमदारांना पोलिसांचा दणका

Bullock Cart Race in Nashik
Bullock Cart Race in Nashikesakal

नाशिक : कोरोनाची (Corona) वाढती रूग्णसंख्या पाहता शासनाने २४ डिसेंबर रोजी कोविड प्रतिबंधाचे निर्बंध लागू केले. मात्र शनिवारी माजी आमदार अनिल कदम यांच्यातर्फे ओझरमध्ये (Ojhar) बैलगाडा शर्यतीचे (Bullock cart race) आयोजन करण्यात आले होते. शर्यतीला पोलिस आणि प्रशासनाने परवानगी नाकारली होती, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. तरीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीसाठी जिल्हाभरातून शेतकरी बैल जोडी आणि घोडे घेऊन दाखल झाले होते. त्यात माध्यमांना शर्यतीबद्दल कळताच त्यांनी या शर्यतींना पूर्ण फुटेज दिल्यामुळे आयोजकांची तत्काळ भंबेरी उडाली. (Bullock Cart Race in Nashik)

ओझरमध्ये आमदार अनिल कदम यांच्यातर्फे बैलगाडा शर्यतीचे (Bailgada Sharyat) आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. स्पर्धेला झालेल्या गर्दी मुळे पोलिस प्रशासनाने हस्तक्षेप केला. पोलिसांना बघताच भीतीपोटी काही स्पर्धकांनी तेथून काढता पाय घेतला. कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याने पोलिस प्रशासनाच्या हस्तक्षेपाने शर्यत अखेर बंद करण्यात आली.

Bullock Cart Race in Nashik
नाशिकच्या चहावाल्याची कमाल; हातच्या जादुने गिऱ्हाईक आकर्षित

इथे तर अनोखी स्पर्धा

निफाड तालुक्यातील रौळस येथे निंबारेश्वर महाराज यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यती भरविण्यात आल्या होत्या. रौळस येथे झालेल्या स्पर्धेला जरी बैलगाडा शर्यत म्हटले जात असले तरी जोडी मात्र घोडा- बैल अशी असते. ओझर येथे गोंधळ झाल्याने स्पर्धा रद्द करावी लागली, त्यामुळे स्पर्धकांसोबतच प्रेक्षकांचाही हिरमोड झाला. त्याचवेळी रौळस येथे मात्र उपस्थितांनी स्पर्धेचा थरार अनुभवला.

Bullock Cart Race in Nashik
आजच्याच दिवशी रचली गेली होती ‘World Wide Web’ची मुहूर्तमेढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com