esakal | शिर्डीला दर्शनासाठी निघालेल्या कारने घेतला पेट; सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

burning car

सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार

sakal_logo
By
अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर (sinner-shirdi-highway) आज सकाळी (ता.१४) सहा वाजता पांगरी शिवारात कारने पेट घेतला. या कारमधून नाशिकचे प्रवासी शिर्डीच्या दिशेने जात होते. धावत्या कारमध्ये दूर निघून लागल्याने चालकाने कार रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर लगेचच कारने पेट घेतला. (Burning-car-on-Sinnar-Shirdi-National-Highway-marathi-news-jpd93)

शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या कारने घेतला पेट

प्रवासी सुरक्षितरीत्या बाहेर पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. नाशिकरोड येथील प्रतीक पंढरीनाथ पवार व वैभव पंढरीनाथ पवार हे आपल्या मर्सिडीज कारमधून ( एमएच ०१ एएक्स ६५०७) नाशिक रोड येथून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. भल्या सकाळी हा प्रकार घडल्याने कार विजवण्यासाठी कोणतीही स्थानिक मदत उपलब्ध झाली नाही. माहिती मिळाल्यावर वावी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताबद्दल माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा: शिष्यवृत्तीने बदलले आयुष्य! लग्नगाठीही जुळल्या

हेही वाचा: लग्नपत्रिकेवरून 'लव्ह जिहाद'चा आरोप; लग्न मोडण्याची वेळ

loading image