
Nashik News : बसथांबे बनले मद्यपींचे अड्डे!
सिडको (जि. नाशिक) : चाणक्य नगर व वावरे नगर आयटीआय अंबड लिंक रोड येथील बसथांबे मद्यपींचा अड्डे बनले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी आमदार निधीतून साकारलेले अनेक बसथांबे शेवटच्या घटका मोजत असून, काही थांबे होत्याचे नव्हते झाल्याचे चित्र आहे. us stops become dean of drunkards Nashik Latest Marathi News)
चाणक्य नगर येथे फलक अस्पष्ट स्थितीत दिसत असून अनेक वर्षापासून येथील स्वच्छता झालेली नसून संपूर्ण थांब्यावर धुळ व गाजर गावात मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे. या बस थांब्याच्या मागील बाजूस काही मद्यपी रात्री मद्य पिण्यासाठी बसत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. यामुळे या ठिकाणी प्रवासी क्षणभरदेखिल थांबत नाही. तर रात्री पोलिस गस्त होऊनदेखील हे मद्यपी येथे ठाण मांडून बसलेले असतात. अशीच काही परिस्थिती येथून जवळ असलेल्या साळुंखेनगर येथील बस थांब्याची झालेली आहे. येथेही नागरिकांना बसण्यासाठी जागा नसून त्यांची बाकावरची जागा धुळीने घेतली आहे.
हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
"येथील काही बस थांब्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, हे बस थांबे दुरुस्त केले तर अतिशय चांगले होईल. त्याचप्रमाणे बसथांबा परिसरात मद्यपींवर कठोर शासन व्हायला हवे."
- सचिन पाटील, सामाजिक कार्यकर्ते
"रात्री येथून परिसरातील महिला रस्त्याने ये- जा करत असतात. काही गुंड प्रवृत्तीचे लोक येथे खुलेआम मद्य प्राशन करत असतात. यामुळे महिला त्यांचा मार्ग बदलणे पसंत करतात."
- राजेंद्र जाधव, रहिवासी