esakal | बसचा ब्रेक फेल..22 प्रवाशांच्या समोर होता साक्षात मृत्यू; नाशिकमधील थरारक घटना
sakal

बोलून बातमी शोधा

bus accident

ब्रेक फेल होऊनही बसचालकामुळे तब्बल 22 प्रवाशांचे वाचले प्राण

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : वेळ दुपारची.. नाशिकच्या पंचवटीतील तारवालानगर सिग्नलवरील घटना...बसमध्ये तब्बल २२ प्रवाशी... ऐन सिग्नलवर बसचे ब्रेक फेल होऊन रस्त्यालगतच्या भिंतीवर बस नेली. पण म्हणतात ना दैव बलवत्तर तर तिथे कुणाचेही चालेना.. काय घडले नेमके? (busdriver-saved-22-people-from-accident-nashik-marathi-news)

दैव बलवत्तर तर तिथे कुणाचेही चालेना..

गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास सीबीएस बसस्थानकातून दिंडोरी रोडमार्गे खुंटविहारकडे निघालेली बस (एमएच-१४- बीटी-३७६१) तारवालानगर सिग्नलजवळ पोचली. या वेळी चालक टी. टी. पगार यांनी ब्रेक मारला. मात्र ब्रेक न लागल्याने तो फेल झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत बस थेट जलसंपदा विभाग, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना कार्यालयाच्या सुरक्षा भिंतीवर घातली. सिग्नल लागलेला असल्याने बसचा वेगही कमी होता. त्यामुळे बस अलगद टेकवल्याने बसमधील २२ प्रवाशांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र यात बसचे नुकसान झाले असून, सुरक्षा भिंतही तुटली आहे.

बसचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे टळला अपघात

सिग्नलवर उभे असलेल्या वाहनचालकांनादेखील वाचविले. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून बस व भिंतीचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी (ता.१०) दुपारी पंचवटीतील तारवालानगर सिग्नलवर घडली. तारवालानगर सिग्नलवर नेहमी अपघात होतात. परंतु या वाढत्या घटना बघता प्रभाग चारचे नगरसेवक जगदीश पाटील यांनी पाठपुरावा करून या सिग्नलवर चारही बाजूंना हॅम्प बसविले आहेत. तेव्हापासून अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. आजदेखील हॅम्पमुळेच बसचा वेग कमी झाला होता. त्यामुळेच चालकाला बसवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले, अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरू होती.

हेही वाचा: नाशिकमध्ये आता दुसरा 'मॅग्नाइट मॅन'!बघण्यासाठी गर्दी

हेही वाचा: भीषण! एकमेकांवर आदळून नऊ वाहने अपघातग्रस्त