esakal | रात्रीस खेळ चाले! लपून-छपून रात्री 12 नंतरही व्यवसाय

बोलून बातमी शोधा

shops
रात्रीस खेळ चाले! लपून-छपून रात्री 12 नंतरही व्यवसाय
sakal_logo
By
अंबादास शिंदे

नाशिक रोड : परिसरात कडक लॉकडाउन (lockdown) असतानासुद्धा सकाळी बारापर्यंत रस्तावर गर्दी बघायला मिळत आहे. दुपारी अनेक ठिकाणी महापालिका व पोलिस (police) कर्मचाऱ्यांची नजर चुकवून बिनधास्त अनेक व्यापारी (shops open in night) लपून-छपून व्यवसाय करीत असल्याने कोरोना (corona virus) कसा थांबणार, असा सवाल उपस्थित होत आहे. (business in night in lockdown period nashik marathi news)

हेही वाचा: देवेंद्र फडणवीसांनी नाशिकला दिलेले 'ते' आश्वासन आज पूर्ण!

नाशिक रोडला बारानंतरही लपून-छपून व्यवसाय

गेल्या महिन्यात कडक लॉकडाऊन घोषित केल्यानंतर सकाळी सात ते अकरापर्यंत अत्यावश्यक व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे, परंतु अकरानंतर सुद्धा अनेक ठिकाणी काही व्यावसायिक लपून- छपून व्यवसाय करीत आहे. ऑनलाइनच्या नावाखाली वाइन शॉप विक्रेते खुलेआम दारू विकत आहे, तर पानटपरी उघडण्याची परवानगी नसतानासुद्धा जादा भावाने पान व सिगारेटची विक्री होत आहे. त्याचप्रमाणे हॉटेलचालक सुद्धा पार्सल देण्याच्या नावाखाली हॉटेल सुरू ठेवतात, परंतु ग्राहकांना मध्ये बसून जेवण चहा, नाश्ता देतात. त्यामुळे सदर ठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. असे असताना सुद्धा पोलिस व महापालिका अशा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई का करत नाही, असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहे. त्याचप्रमाणे फळ विक्रेते व टरबूज विक्रेतेसुद्धा लपून-छपून व्यवसाय राजरोस करत आहे.

पोलिस व प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे

लॉकडाउन असतानासुद्धा सर्रास नियमाचे उल्लंघन होत असल्याने कोरोना रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस व प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे

हेही वाचा: महाराष्ट्र - गुजरात सीमेवर पोलिस सतर्क; ई-पास असणाऱ्यांनाच प्रवेश