esakal | महाराष्ट्र - गुजरात सीमेवर पोलिस सतर्क; ई-पास असणाऱ्यांनाच प्रवेश

बोलून बातमी शोधा

police checking on Maharashtra-Gujarat border
महाराष्ट्र - गुजरात सीमेवर पोलिस सतर्क; ई-पास असणाऱ्यांनाच प्रवेश
sakal_logo
By
अरुण भामरे

अंतापूर (जि. नाशिक) : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाबंदी करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून जायखेडा पोलिस ठाण्याअंतर्गत एक आंतरराज्य हद्द व दोन जिल्हा हद्दीवर पोलिस तपासणी केंद्र असून, वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. येथे महाराष्ट्र - गुजरातची सीमा असल्याने पोलिस प्रशासन अधिकच सतर्क आहे. नागरीकांनी महत्वपूर्ण काम असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन जायखेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी केले आहे. (Only those with e-pass can enter the Maharashtra-Gujarat border)

होणार कसून चौकशी…

बागलाण तालुक्यात देशी भागासह पश्‍चिम आदिवासी भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने काही रुग्ण शेजारील गुजरात राज्य व धुळे जिल्ह्यातून ये - जा करत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गुजरात - महाराष्ट्र सरहद्दीवर बाभुळणे (चिंचली घाट) येथे व नाशिक - धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीवरील विंचूर - प्रकाशा राज्य मार्गावरील कातरवेल, नामपूर परिसरातील चिराई येथे पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. त्यात अत्यावश्यक सेवा शेती माल व इतर आरोग्य सुधारणा विषयक सेवा असल्यास ई-पासद्वारे चौकशी करून सोडण्यात येत आहे. जायखेडा पोलिस ठाण्याअंतर्गत ९५ गावांची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ४३ पोलिस कर्मचारी व १७ होमगार्डची मदत घेतली जात आहे. हद्द तपासणीसाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्णा पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एम. एम. नवगिरे, पोलिस हवालदार राजेंद्र वाघ, निंबा खैरनार, बापू फंगाळ, श्री. बच्छाव आदी कर्मचारी काम पाहत आहेत.

हेही वाचा: डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय HRCT चाचणी करताय? आधी हे वाचा

''जिल्हाबंदीचा आदेश असल्याने तपासणी नाक्यावर पोलिसांबरोबरच आरोग्य विभागाचे कर्मचारी तपासणीसाठी असल्यास अधिक योग्य होईल. नागरिक, दुकानदार, वाहनधारकांनी विनाकारण बाहेर न पडता घरातच थांबून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.''

- श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक पोलिस निरीक्षक, जायखेडा

(Only those with e-pass can enter the Maharashtra-Gujarat border

हेही वाचा: यंदा चांगला पाऊस? कावळ्यांच्या घरट्यांमुळे वरुणराजाचा अंदाज