नाशिक- शहरातील आयात-निर्यात करणाऱ्या व्यावसायिकाला व्यवसायवृद्धीचे टिप्स देताना सायबर भामट्याने लसणाची पावडर खरेदी करण्याचे आमिष दाखवून तब्बल आठ लाख ६४ हजारांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.